नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात मान्यता प्राप्त नसलेल्या अवैध शाळा त्वरीत बंद करण्याची मागणी आम आदमी पक्ष शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कार्यालयामार्फत माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सीबीएससी सलग्न शाळांच्या व्यतिरिक्त तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक सेमी इंग्लिश मिडीयम अशा भरपूर शाळा नंदुरबार जिल्ह्यात अवैधप्रमाणे सुरु असून त्यात विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमावस्था असून अशा अवैध सुरु असणाऱ्या संस्था चालकांकडून अव्वाचा सव्वा शैक्षणिक फी आकारली जाणे किंवा निवासी शाळांमध्ये निवासी फीच्या नावाखाली अव्वाच्चा सव्वा फी आकारली जाते .
त्यात काही निवासी शाळांमध्ये उपहारगृह अवैधरित्या अवैधरित्या सुरु असून त्यांना कुठल्या प्रकारे महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे , हेही स्पष्ट होत नाही . त्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची शिक्षणाच्या बाबतीत फसवणूक होत असून अशा अवैध शाळा चालविणाऱ्या शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या तथाकथित स्वयंमघोषीत शिक्षण सम्राटांवर त्वरीत कारवाई करुन अवैध शिक्षण देणाऱ्या शाळा बंद कराव्यात .नंदुरबार जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात , कुठल्या शहरात महाराष्ट्र शासन व केंद्र शासन मान्यता प्राप्त किती शाळा आहेत ? त्याची यादी पालकांसाठी वृत्तपत्रातून तात्काळ प्रसिद्ध करुन अशा शाळांमध्ये शैक्षणिक फी व निवासी संकुलाची फी किती असावी ? याबाबतही शिक्षण विभागाने वृत्तपत्रातून तात्काळ खुलासा करावा . वरील शिक्षणाच्या बाजार मांडणाऱ्या संस्था चालकांवर २६ जून २०२३ पर्यंत कारवाई न झाल्यास आम आदमी शेतकरी संघटना आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल , याची आपण गंभीर दखल घ्यावी , अशी मागणी आम आदमी पक्ष शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.








