Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरीत भरपाई मिळावी, राष्ट्रवादी युवकतर्फे निवेदन

team by team
June 17, 2023
in राजकीय
0
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरीत भरपाई मिळावी, राष्ट्रवादी युवकतर्फे निवेदन
नंदुरबार l प्रतिनिधी
अण्णासाहेब विकास मंडळ कार्यालय नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करावे. तसेच नंदुरबार तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे दि.१५ जून रोजी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर असता त्यांची भेट घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव आहेत व त्यात बेरोजगार आर्थिक दुर्बल देखील आहेत. आपल्या मार्फत अण्णा साहेब विकास महामंडळाला आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला.
परंतू जिल्ह्याच्या ठिकाणी मंडळाचे कार्यालय नाही. सदर मंडळाच्या योजनांपासून जिल्ह्यातील मराठा समाज बांधव हे वंचित राहिले आहेत. तरी सदर कार्यालय नंदुरबार जिल्हाच्या ठिकाणी सुरु करावे.
नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. गुरे, ढोरे, बकरी असे असंख्य जनावरे दगावले होते, त्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील २ मंडळाची आणेवारी ही ५० पेसेच्या आत आहे. तरी या भागातील कोरड्या दुष्काळाची मदत अजून मिळालेली नाही. तसेच चालू वर्षी पिक कर्जासाठी शेतकरी बांधवांना बँकेकडून पाहिजे तसे सहकार्य व कर्ज मिळत नाही. मागील वर्षी देखील शासनाने दिलेल्या उद्दीष्टेपेक्षा ५० टक्केपेक्षा जास्त शेतकर्‍यांना कर्ज मिळाले नाही. तशीच परिस्थिती यावर्षी देखील दिसत आहे. तरी आपण आपल्या स्तरावर जिल्ह्यातील शेतकरी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, नंदुरबार तालुकाध्यक्ष बबलू कदमबांडे, उपाध्यक्ष राहुल जगदेव, डॉ.जगदिश चौधरी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात मान्यता प्राप्त नसलेल्या अवैध शाळा त्वरीत बंद करा, अन्यथा आंदोलन

Next Post

मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जून पर्यंत नोंदणी करावी; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जून पर्यंत नोंदणी करावी; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जून पर्यंत नोंदणी करावी; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add