नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुकास्तरीय प्रवेशोत्सव सोहळा आ.आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली . जि.प.मराठी शाळा राजमोही ल.येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळा राजमोही लहान केंद्र वाण्याविहीर येथे तालुकास्तरीय प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य तथा लोकप्रिय आ. आमश्या पाडवी यांच्या शुभहस्ते झाले. त्यांच्यासमवेत पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसभापती विजय पाडवी, सरपंच यमुनाताई पाडवी ,सामाजिक कार्यकर्ते जगदीश पवार ,अक्कलकुवा तालुक्याचे गट विकास अधिकारी एल.जे.पावर ,तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मंगेश निकम, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती आरती शिंपी,शि.वि.अ. श्री भावसार, केंद्रप्रमुख मोहन बिसनारीया ,शा.व्य.समिती अध्यक्ष व सदस्य,ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षण प्रेमी नागरिक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सजवलेल्या बैलगाडी रथा मध्ये आमदार पाडवी यांच्या हस्ते बसवून नवप्रवेशित मुलांची प्रवेश दिंडी काढण्यात आली ,

नवप्रवेशीत मुलांच्या घरी जाऊन त्यांचे स्वागत आमदार यांनी केले व त्यांच्या घराजवळ वृक्षारोपण करण्यात आले.ढोल ताशांचा गजरात, लेझिम पथक व संचालन करत मुलांना शाळेच्या प्रांगणात आणण्यात आले , प्रांगणात आल्यानंतर सर्व मुलांना वर्गनिहाय बसवण्यात आले, कार्यक्रम स्थळी आल्यानंतर सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले. तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय परिषद सोहळ्यात सूत्रसंचालन करत उपस्थितांची मने जिंकली .
शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आमदार.आमश्या पाडवी यांनी भूषवले ,तसेच विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागत गीत गाऊन उपस्थितांचे स्वागत केले ,भारतीय संस्कृती प्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने शाल ,श्रीफळ पुष्पगुच्छ व वृक्षारोपण साठी आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला ,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन बिसनारीया यांनी केले ,सर्व नवप्रवेशित मुलांना सर्व मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प,गणवेश, पाठ्यपुस्तक, लेखन साहित्य देऊन त्यांना शाळेत प्रवेश दिला ,त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले
यावेळी बोलताना आमदार.आमश्या पाडवी यांनी शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच येणाऱ्या काळात शैक्षणिक दृष्टीने मार्गक्रमण करत असताना आवश्यक त्या सूचना देऊन कार्यवाही करण्याची सूचित केले. शेवटी श्री.धसे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास गावातील सर्व पालक व ग्रामस्थ बंधू भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि प शाळा राजमोही लहान मुख्याध्यापक प्रविण देवरे , सहशिक्षक फारुक बागवान व जि प शाळा राजमोही लहान उर्दू सर्व शिक्षकवृंद , अंगणवाडी सेविका उषाताई पाडवी यांनी मेहनत घेतली.केंद्रातील तुषार पाटील, सुनील धुळे, विलास पवार, गणेश लवांडे , जगदीश धसे यांनी उपस्थिती देऊन सहकार्य केले.








