Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुन्हेगारांवर पोलिसाची असणार वॉच : 15 चेक पोस्ट स्थापन, 8 अधिकारी व 36 पोलीस अंमलदार तैनात

team by team
June 16, 2023
in क्राईम
0
गुन्हेगारांवर पोलिसाची असणार वॉच : 15 चेक पोस्ट स्थापन, 8 अधिकारी व 36 पोलीस अंमलदार तैनात
नंदुरबार  l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 15 चेक पोस्ट स्थापन करण्यात आला असून 8 अधिकारी व 36 पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण / उत्सवांच्या काळात किरकोळ कारणांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत आंतरजिल्हा चेक पोस्ट तयार करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील शहरांमध्ये येण्याचे ठिकाण (Entry Point) व बाहेर पडण्याचे ठिकाण (Exit Point) याबाबत आढावा घेवून जिल्ह्यांतर्गत व गुजरात / मध्यप्रदेश राज्यांच्या सिमेलगत नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाणे अंतर्गत 15 चेक पोस्ट स्थापन करुन त्याठिकाणी एकुण 8 पोलीस अधिकारी व 36 शस्त्रधारी पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले असून, शहरात येणाऱ्या व शहरातून जाणाऱ्या सर्व लहान मोठ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. सदरचे चेक पोस्ट हे 24 तास तैनात राहणार आहेत. आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सवांच्या काळात स्थापन करण्यात आलेले चेक पोस्ट पुढीलप्रमाणे आहेत.
नंदुरबार शहर, साक्री नाका, कोरीट नाका, बायपास उड्डाणपुल (शहादाकडे जाणाऱ्या रस्त्यावर), उपनगर नळवा नाका धानोरा नाका (खांडबाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर),
नंदुरबार तालुका ठाणेपाडा नाका,नवापूर बेडकी नाका, विसरवाडी खांडबारा चौफुली, शहादा दरा फाटा, सारंगखेडा अनरद बारी नाका, म्हसावद खेडदिगर नाका, धडगांव भुशा नाका काकरपाटी नाका, अक्कलकुवा मोलगी रोड नाका,
तळोदा कुकरमुंडा फाटा नाका असे नाके असणार आहेत.दरम्यान 14 जुन  रोजी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील म्हसावद ते धडगांव रस्त्यावर रामपूर गावाचे फाट्यावर रस्त्यावर चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान विरसिंग वनकर पावरा रा. चिखली ता. धडगांव जि. धडगांव नानशा जहाँगीर पावरा  रा. बोरी ता. धडगांव जि. नंदुरबार  व एक अल्पवयीन मुलगा हे त्यांच्या ताब्यातील वाहनांमध्ये गुरांना अतिशय निर्दयतेने कोंबून पाय व मान बांधून गैरकायदेशीरपणे वाहतूक करतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून 23 लाख 2 हजार रुपये किमतीचे 26 गुरे व 3 वाहन असा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांचेविरुध्द् प्राण्यांना निर्दयतेने वागविणे, प्राणीसंरक्षण (सुधारणा) अधिनियम, मोटार वाहन कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपी व मुद्देमाल म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापुरे अविनाश चव्हाण पोलीस अंमलदार दिपक न्हावी, किरण मोरे, अभिमन्यु गावीत यांनी केली आहे.
 जिल्हा पोलीस दलातर्फे उभारण्यात आलेल्या चेक पोस्टच्या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी भेट देवून, नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करतांना नागरीकांना विनाकारण त्रास होणार नाही. तसेच काही संशयास्पद मिळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देवून मार्गदर्शन केले. तसेच नाकाबंदीचे ठिकाणीअधिकारी व अंमलदार यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

वाहनासह सव्वा नऊ लाखांचा गुटखा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

आ.आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात

Next Post
आ.आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात

आ.आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add