नवापूर l प्रतिनिधी
नांदेड येथील बोढार या गावातील अक्षय भालेराव निर्घृण हत्या प्रकरणातील तात्काळ खालील मागण्या पुर्ण होणे बाबतची मागणी तथा निवेदन नवापूर येथील बहुजन समाज बांधव यांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिले आहे.
दि. १ जून २०२३ रोजी महाराष्ट्रातील नांदेड ह्या जिल्ह्यातील बोढार या गावात भिमजयंती साजरी करण्यात आली होती. याचा राग मनात धरुन एका बौध्द युवक अक्षय भालेराव याची निघृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. गावातीलच काही माथेफिरु तरुणांनी जातीयवाद मनात धरुन ही हत्या केलेली आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या ह्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडून येणे हे अतिशय दूर्दैवी बाब आहे. तसेच आता नुकतेच तीन दिवसांपूर्वी मुंबई चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले
महिला वसतिगृहात राहणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा निर्घृण खुन करण्यात आला. म.फुले शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र समजला जाणाऱ्या या राज्यात दलितांवर असे अन्याय-अत्याचार होणे अतिशय क्लेशदायक आहे. वरील दोन्ही घटना पाहता आरोपींना लवकरात लवकर अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियास तातडीने नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी.
अक्षय भालेराव यांचा जखमी झालेला भाऊ आकाश यास शासकीय नोकरी देण्यात यावी.अक्षय भालेराव निघृण हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.या प्रकरणात सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी.
एस.आय.टी. द्वारे संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास तात्काळ कायमस्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे. राज्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील बौध्द वस्तीस पोलीस चौकीची स्थापना करण्यात यावी.कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात यावा अक्षय भालेराव यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी माजी नगसेवक चंद्रकात नगराळे,सुनील वाघ,विजय पवार प्रविण तिरमली,छोटु अहिरे,
जितेंद्र अहिरे, संतोप शिरसाठ,विजय तिजविज,अँड.राहुल शिरसाठ,चेतन पवार,दिनेश नगराळे,प्रभाकर अहिरे,राकेश वाघ,जितेंद्र साळवे,सिध्दार्थ सिरसाठ,प्रा संतोष सिरसाठ,नाना साळवे,विशाल बेडसे,गौरख नगराळे,राहुल सुर्यवंशी,प्रभाकर महिरे उपस्थित होते.








