नंदूरबार l प्रतिनिधी
मागील वर्षी भावाचा खून करून संशयित जेल मध्ये गेला होता.तो जामिनावर घरी आला असता भावाचा बदला म्हणून सात जणांनी त्याला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना धडगाव तालुक्यातील बिजरी जुना पाटीलपाडा येथे घडली आहे याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील बीजरी येथे मागील वर्षी रुमा तडवी याने भरत वळवी याचा खून केल्याने त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाल्याने तो जेल मध्ये होता. तो जेल मधून जामिनावर सुटला.भरत वळवी याचा खून झाल्याने भावाचा बदला म्हणून लालसिंग वळवी व इतर सहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेश असताना धडगाव तालुक्यातील बिजरी जुनापाटीलपाडा येथे रूमा उतऱ्या तडवी ( ४९) रा. बिजरी वाघबारीपाडा ता.धडगाव याला गाठत लालसिंग वळवी व इतर सहा जणांनी त्याच्या डोक्यावर,पाठीवर, पोटावर लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या, डेगाऱ्याने मारहाण करीत त्याचा खून केला म्हणून आशा रूमा तडवी रा.बिजरी वाघबारीपाडा ता.धडगाव यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात लालसिंग खेमा वळवी, शिवाजी खेमा वळवी, दामा खेमा वळवी, रागा खेमा वळवी,
सिमा खेमा वळवी, मालसिंग भरत वळवी, अनिल भरत वळवी सर्व रा.बिजरी वाघबारीपाडा ता.धडगाव यांच्या विरुद्ध भादवी कलम 302, 143, 147, 148, 149 सह महा.पो. अधी 37 (1) (3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि आय.एन.पठाण करीत आहेत.








