नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबारच्या राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने नवापूर- चरणमाळ रस्ता बोरझर फाटया जवळ, ता. नवापूर येथे अवैधपणे परराज्यातील मदयाची वाहतुक करतांना बोलेरा पिकअप वाहनासह १२ लाख ९६ हजार ५६० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १३ जुन रोजी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक (अंव द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, सुनिल चव्हाण ,विभागीय उपायुक्तराज्य उत्पादन शुल्क नाशिक, डॉ.बी.एच.तडवी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नंदूरबार सौ. स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नवापूर चरणमाळ रस्ता बोरझर ता.नवापूर फाटया जवळ पथक दबा धरून बसले असतांना चरणमाळ घाटाकडून एक बोलेरो पिकअप वाहन येतांना दिसले त्यास थांबवण्याचा इशारा केले असता. सदर वाहनचालकाने गाडी थोडया लांब अंतरावर उभी करून वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला. सदर वाहना जवळ तपासणी केली असता,
त्यात इंम्पेरियल ब्ल्यू व्हिस्को १८० मि.ली चे १०० बॉक्स (महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले), रॉयल चॅलेज व्हिस्कीचा १८० मि.ली चा एक बॉक्स व टूबर्क बिअर ५०० मि.ली तीन चे १९ बॉक्स. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्वये करण्यात आली.
सदरची कार्यवाही निरीक्षक डी. एम. चकोर , दुय्यम निरीक्षक, पी.एस. पाटील, निरीक्षक पी.जे.मेहता, दुय्यम निरीक्षक एस. आर. नजन, नंदुरबार जवान सर्वश्री. भुषण चौधरी, हंसराज चौधरी, संदीप वाघ, हितेश जेटे, अविनाश पाटील, धनराज पाटील, अजय रायते, राहुल साळवे, मानसिंग पाडवी, सहा. दु. निरीक्षक मोहन पवार, हे सदर कार्यावाहीत सहभागी होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, नंदुरबार डी. एम. चकोर हे करीत आहेत.








