Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओपनसाठी २० तर ट्रायबल’साठी केवळ ६ लाखांचीच उत्पन्न मर्यादा,परदेश शिष्यवृत्तीत अन्याय,ट्रायबल फोरम

team by team
June 12, 2023
in राज्य
0
ओपनसाठी २० तर ट्रायबल’साठी केवळ ६ लाखांचीच उत्पन्न मर्यादा,परदेश शिष्यवृत्तीत अन्याय,ट्रायबल फोरम

नंदुरबार l प्रतिनिधी
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या सर्वच घटकांसाठी परदेश  शिष्यवृत्ती योजना आहे. यात सर्वसाधारण म्हणजे ओपनसाठी  उत्पन्नाची मर्यादा २० लाख रुपये आहे  अन् अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी केवळ ६ लाख रुपये आहेत.उत्पन्नाच्या फरकामुळे सर्व सामान्य आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाही.ही बाब अन्याय करणारीआहे.त्यामुळे आदिवासींचीही उत्पन्न मर्यादा वाढवून २० लाख करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन २००५ पासून परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाठविल्या जाते.याकरिता शिष्यवृत्तीची योजना असून उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपये आहेत.यात भूमिहीन आदिवासी कुटुंबातील, दुर्गम भागातील व आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांस प्राधान्यक्रम दिला आहे.
त्या विद्यार्थ्यांपर्यंत एकतर योजना पोहोचली नाहीत.कदाचित काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलीही असेल पण योजनेविषयी अज्ञानामुळे आणि गरीबीमुळे त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात मजल मारली नाही. उत्पन्नाच्या अटी व शर्तीमुळे सर्व सामान्य आदिवासी कुटुंबातील विद्यार्थीही योजनेला मुकले आहे. परिणामतः परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना मिळू शकला नाही.
दुसऱ्या बाजूला शासनामार्फत हीच योजना सर्व साधारण गटातील म्हणजे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीताही राबविण्यात येत आहेत.परंतू त्यांच्यासाठी किचकट अटी व शर्ती नाही.आणि उत्पन्नाची मर्यादा २० लाख रुपये आहे.
परदेश शिष्यवृत्ती योजनेतील उत्पन्न मर्यादा खुल्या संवर्गाच्या तुलनेत आदिवासींची उत्पन्न मर्यादा कमी निर्धारित केल्यामुळे अन्याय झालेला आहे.त्यामुळे ते परदेशातील उच्च शिक्षणासाठी असलेल्या लाभाचा फायदा घेऊ शकले नाही.
विद्यार्थी क्षमताही १०० करावी
आदिवासी समाजातील विद्यार्थी  परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले पाहिजे.याकरिता सद्यस्थितीत परदेश शिक्षणासाठी असलेली १० विद्यार्थी क्षमता बदलवून ती १०० करण्यात यावी.आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी उमेदवार किंवा पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी.
 नितीन तडवी जिल्हाध्यक्ष, ट्रायबल फोरम नंदुरबार.
बातमी शेअर करा
Previous Post

चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा

Next Post

श्री. संत सेना नाभिक शिक्षण समितीतर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वितरण

Next Post
श्री. संत सेना नाभिक शिक्षण समितीतर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वितरण

श्री. संत सेना नाभिक शिक्षण समितीतर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add