बोरद l प्रतिनिधी
१० जून २०२३ रोजी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे बोरद परिसरात असलेल्या सातपुड्याच्या पायथ्या नजीक वसलेल्या गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
सातपुड्याच्या पायथ्या नजीक असलेल्या मालदा,जुवाणी,न्यूबन,बन आणि धजापाणी परिसरात अचानक संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊसा सह वाऱ्याचा जोर जास्त असल्याने मालदा येथे असलेल्या १२ घरांचे मोठे नुकसान झाले. आहे त्याचबरोबर न्यूबन येथील ९ घरांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले आहे. तर धजापाणी हा भाग थोडासा वरती असल्याकारणाने या गावात परिसरातील २१ घरांचे अतोनात नुकसान झाले आहे.न्यूबन येथे ५ तर बन येथे २ घरांचे नुकसान झाले आहे.
हा पाऊस साधारणत दोन तास सुरू राहिल्याने आणि पावसाचे प्रमाण व वाऱ्याचा वेग मोठा असल्याने परिसरात जलमय वातावरण निर्माण झाले होते.प्रथमच नदी ,नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले.

यामुळे नुकसानग्रस्तांना मोठ्या हाल अपेक्षा या पावसामुळे सहन कराव्या लागल्या.डोक्यावरचे छत नाहीसे झाल्याने सर्वांनी रात्र ही या ठिकाणी जागूनच काढली आहे.कुणाचे पूर्ण घरच नेस्तनाबूत झाले तर काहींचे पत्र्याचे छत संपूर्ण उडून गेले.त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरल्याने भिंती कोसळल्या आहेत.
याबाबत मालदा ग्रुप ग्रामपंचायत येथील सरपंच करुणा पावरा यांचे पती गोपी पावरा यांनी लागलीच नुकसानग्रस्त भागाला भेट दिली व पाहणी केली.त्यानंतर त्यांनी तहसीलदार गिरीश वखारे यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनाही लागलीच संपर्क करत त्यांनाही झालेल्या नुकसानाची माहिती दिली.
आ.राजेश पाडवी यांनी प्रशासनाला पंचनामा करण्याच्या सूचना दिल्याने आज रोजी तलाठी अरुण धनगर यांनी संबंधित गावांना भेट देत झालेल्या नुकसानीची पहाणी केली.त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान अशोक मोतीराम मोरे,चंपीबाई तुंबड्या ठाकरे, दयानंद बारक्या वळवी ,जाधव राण्या पाडवी, रायसिंग दशरथ नाईक दिलीप वगऱ्या पवार या ६ लोकांचे झाले आहे साधारणतः ५० हजार ते ८० हजारापर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज पंचनाम्यात नमूद करण्यात आला आहे.यांचे पूर्ण घरे उद्वस्त झाली आहेत.
या पंचनाम्यावेळी गोपी पावरा, तलाठी अरूण धनगर, ग्रा.पं. सदस्य विजू मावची,आंबूलाल वळवी,ग्रा. पं.कर्मचारी कांतीलाल वळवी, अशोक मोरे,अजीत मावची,सुरूश मोरे,डोंगरसिंग पावरा,हे उपस्थित होते.








