Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर येथील अँग्रो एजन्सीतुन दोन लाखाचे अनाधिकृत एच. टी. बी. टी. कापुस बियाणे जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
June 9, 2023
in क्राईम
0
खापर येथील अँग्रो एजन्सीतुन दोन लाखाचे अनाधिकृत एच. टी. बी. टी. कापुस बियाणे जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी

खापर ता अक्कलकुवा येथील मिराई अँग्रो एजन्सी येथे कृषि विभागाच्या पथकाने धाड टाकत दोन लाखाचे अनाधिकृत एच. टी. बी. टी. कापुस बियाणे जप्त केले आहे.याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी खापर ता. अक्कलकुवा येथे गणेश मनोज मराठे, मुकेश मोहन मराठे यांच्या मिराई अँग्रो एजन्सी येथे अनधिकृत कापूस (एच.टी.बी. टी.). वाहतूक, साठवणूक व विक्री बाबत गुप्त माहिती होती.त्यातच कृषि विभागाच्या पथकाने खापर व परिसरात अनाधिकृत कापुस एच.टी.बी. टी. बियाणे दाखल झाल्याची बातमी मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथकाने मिराई अँग्रो एजन्सी खापर ता. अ. कुवा येथे दाखल झाले. त्यावेळी सदर दुकानाची तपासणी केली असता दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत सिलबंद तीन पोते बियाणे आढळून आले. सदर बियाण्याबाबत गणेश मनोज मराठे, रा. खापर ता. अ. कुवा यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. भरारी पथकासमक्ष सदरचे पोते उघडले असता 2 लाख 4 हजार 400 रुपये किमतीचे अनाधिकृत कापुस एच.टी.बी. टी. बियाण्याची 146 पाकीटे आढळून आली. सदर कारवाई अंतर्गत भरारी पथकातील मोहीम अधिकारी जे. एस. बोराळे यांनी गणेश मनोज मराठे, मुकेश मोहन मराठे रा. खापर ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार, मिराई ॲग्रो एजन्सी यांच्याविरूद्ध अनाधिकृत कापुस (एच.टी.बी.टी.) वाहतूक, साठवणूक व विक्री बाबत अक्कलकुवा पोलीस राहण्यात गुन्हा दाखल केला.

सदर कारवाई (भा.प्र.से.) गट विकास अधिकारी, पंचायत समिती अक्कलकुवा पुलकित सिंग यांच्या उपस्थितीत तसेच विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार तानाजी खर्डे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार प्रकाश खरमाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील सदस्य तालुका कृषि अधिकारी अक्कलकुवा निलेश गढरी, तंत्र अधिकारी, कृषि विभाग विजय मोहिते, कृषि अधिकारी योगेश हिवराळे यांच्या पथकाने केली.

शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानांवरूनच बियाणे खरेदी करावे, त्यामुळे बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दलित तरुणांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या – परिवर्तन युवा मंचची मागणी

Next Post

जामलीत निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार, गाव सेवा समितीने राबविला उपक्रम

Next Post
जामलीत निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार, गाव सेवा समितीने राबविला उपक्रम

जामलीत निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार, गाव सेवा समितीने राबविला उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add