नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यातील दिव्यांगंच्या विविध प्रश्नांवर अपंग कल्याण आयुक्त यांची अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे राज्य अध्यक्ष आनंद पाटील याच्या नेतृवात शिष्टमंडळाची भेट घेत विविध समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट् राज्याच्यावतीने राज्यातील विविध अपंगाचा समस्या व प्रश्न यावर पुणे अपंग कल्याण आयुक्त ओम प्रकाश देशमुख याना निवेदन देऊन बीजभांडवल, सबसिडी व झेराँक्स मशीन मिळावे अशी मागणी चर्चेतून केली.अपंग आयुक्त पुणे ओमप्रकाश देशमुख यांनी समाज कल्याण अधिकारी नांंदगवकर यांना फोन लाऊन त्वरीत लाभ द्या असे सांगितले.
सुमारे एक तास अपंग जनता दल सामाजिक संघटना चे राज्य अध्यक्ष आनंद पाटील, राज्य महिला उपाध्यक्ष प्रतिक्षा वसावे, राज्य उपाध्यक्ष पुष्पा नाईक पालघर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने चर्चा केली .यावेळी नंदुरबार जिल्हाध्यक्ष मंगेश सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष बिलु महाराज मोतीलाल वळवी,सचिन जाधव,राजु मामा, प्रेमराज वळवी, याच्यासह अनेक अपंग पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते .








