नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यात रविवारी चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ,सदस्य ,राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली असून महसूल विभागातर्फे तातडीने पंचनामे करण्याची मागणी तहसीलदार गिरीश वखारे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की,तळोदा तालुक्यात दोन दिवसावर प्रती तासी 65 किमी वेगाचा चक्रीवादळ आल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेंच चक्रीवादळ मुळे विद्युत रोहित्र, विजेचे खांब सुद्धा जमीनदोस्त झाले.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतकरी प्रतिनिधी म्हणून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय,संचालक निखिल तुरखिया, संचालक प्रल्हाद आप्पा फोके,संचालक पिंटू गाढे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष योगेश मराठे,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी यांनी नुकसानग्रस्त शेतकरी पितांबर मंगा पाटील,दीपक मनोहर पाटील,संतोष भीमराव पाटील,कनिलाल रतिलाल पटेल,विनोद मनोहर पाटील या शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेतली तसेंच शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होऊन लवकरात लवकर् शासनामार्फत मदत मिळवून द्यावी अशी मागणी निवेदनातुनकरण्यात आली आहे.








