भालेर l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९७.४३ टक्के एवढा घवघवीत लागला.


यात ठाकरे वैशालीकुमारी संजयभाई ८२.३३ टक्के वैशाली रमेश भिल ७३.८३ टक्के विशाल मोहन धनगर ७२.१७ टक्के, निकिता दिलीपसिंग गिरासे ६८.५० टक्के, प्रियंका कन्हैयालाल पाटील६८.१७ टक्के या प्रथम पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. तसेच इतर विद्यार्थीही उत्तम टक्केवारीसह यशस्वीपणे उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आ. चंद्रकांत रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी,सचिव यशवंतराव पाटील,कार्यालयीन अधिक्षक पुष्पेंद्र रघुवंशी,प्राचार्य आर.एच.बागुल, प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








