Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळे-सुरत मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, पोलिसांत गुन्हा दाखल

team by team
May 26, 2023
in क्राईम
0
धुळे-सुरत मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, पोलिसांत गुन्हा दाखल
नंदूरबार l प्रतिनिधी
सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर साक्री गावालगत असलेल्या नवकार मोटर्स जवळ युरिया केमिकल टाकण्यास आलेल्या ट्रक चालकास नवकार टाटा मोटर्स येथे कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्याचा ट्रक चालकांशी वाद झाल्याने ट्रक चालकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन ट्रक चालकांवर नवापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
राजस्थान येथून हैदराबादच्या दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्गावर साक्री गावालगत नवकार टाटा मोटर्स सर्विस स्टेशन येथे युरिया गाडीत भरण्यासाठी आले असता त्या नवकार मोटर्स ठिकाणी मालट्रक मध्ये युरिया भरणा करत असताना तेथील कर्मचाऱ्यांशी ट्रक चालकाचा वादविवाद झाला त्या अनुषंगाने ट्रक चालकास मारहाण करण्यात आली.  त्यानंतर दुसरा ट्रक चालक देखील त्या ठिकाणी आला असता त्यास देखील कर्मचारी व त्याचे सहकारी मारहाण केली तसेच पहिल्या ट्रक चालकास चा महामार्गावर पाठलाग करत इच्छापुर गावाला लगत रस्त्यात गाठून त्यास मारहाण करून त्या ट्रकचे पुढील काचा तसेच इतर साहित्याचे दगडे मारून नासधूस करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले तसेच ट्रक मध्ये असलेली रोख रक्कम देखील लांबिवली असल्याचे ट्रक चालक यांनी सांगितले.
त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात गाजी खान रा. जैसलमेर (राजस्थान) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावेळी महामार्गावरील पर राज्यातील वाहनधारक भयभीत झाले असून अशा घटनेतून परिसराची बदनामी होत आहे. पर राज्यातील वाहन चालक यांची अशाप्रकारे जर मारहाण करून लूटमार होत असेल तर स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यावर कडक कारवाई करणेबाबत ठोस पावले उचलावीत. अशी अपेक्षा सर्वसामान्यांसह वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन अक्षताची गाव पातळीवर जनजागृती

Next Post

सारंगखेडा येथे ११ लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

Next Post
सारंगखेडा येथे ११ लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

सारंगखेडा येथे ११ लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add