Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धक्कादायक घटना : तरुणाचा लग्नाच्या तीन दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू

team by team
May 26, 2023
in क्राईम
0
धक्कादायक घटना : तरुणाचा लग्नाच्या तीन दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू
बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथील एका तरुणाचा लग्नाच्या तीन दिवस आधीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरद ता.तळोदा येथील तरुण व मॉडर्न इंग्लिश स्कूल चा मनमिळाऊ माजी विद्यार्थी चेतन (किसन) कोळी ( वय २२) याचा विवाह दि.२९ मे २०२३ रोजी घटिक मुहूर्तावर शिंदखेडा येथील राजेंद्र श्रावण निकुंभ यांची कन्या दिपाली हिच्याशी विवाह निश्चित झाला होता.तत्पूर्वी तो अहमदाबाद  (गुजरात) याठिकाणी नोकरीला होता.लग्नानिमित्त काही दिवसांच्या रजेवर तो घरी आपल्या बोरद या गावी परतला होता.लग्नाचा उत्साह असल्याने तो व घरचे सर्व खुष होते.
     तो स्वतः लग्नाच्या पत्रिका गावात मोठ्या आनंदाने वाटप करत होता. व प्रत्येकाला आग्रहाने आमंत्रित करीत होता.  दि.२५ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजता तो बाथरूम मध्ये काहीतरी काम करीत असताना अचानक त्याची प्रकृती खराब झाली व तो त्याठिकाणी खाली कोसळला .त्याबाबत आवाज झाल्याने जवळ असलेल्यांनी बाथरूम मध्ये जाऊन बघितले असता.तो अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला.तेवढ्यात घरचे सगळेच तसेच मित्रमंडळी त्याठिकाणी जमा झाल्याने त्याला लागलीच शहादा येथे खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचे निश्चित झाले.परंतू काळाचा घाव एवढा मजबूत होता की,काळाने त्याला शहादा पर्यंत देखील पोहचू दिले नाही.रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
   ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.आणि त्याच्या नातलागवर तसेच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला याबाबत गावात हळहळत व्यक्त करण्यात येत आहे. बोरद देखील देविदास गोपाळ शिरसाठ यांचा पुतण्या व कै. राजाराम गोपाळ शिरसाठ यांचा  चेतन उर्फ किसन हा मुलगा त्याच्या निधनाने संपूर्ण बोरद गाव बंद ठेवण्यात आले.
      ज्याच्या लग्नाला जाण्यास गावकरी उत्साहित होते.त्याच्या प्रेतयात्रेत गावकऱ्यांना जावे लागले.त्याच्या प्रेतयात्रेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले.परंतू प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू आल्यावाचून राहिले नाहीत.  त्याच्या पश्चात आई, काका,काकू,३ बहिणी, चुलत भाऊ, मेव्हणे असा परिवार आहे.काकांचा मुलगा निलेश यांने अंत्यसंस्कार केले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्यातील शिबिरात विविध प्रकारच्या 300 दाखल्यांचे वाटप

Next Post

जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन अक्षताची गाव पातळीवर जनजागृती

Next Post
जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन अक्षताची गाव पातळीवर जनजागृती

जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन अक्षताची गाव पातळीवर जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add