नंदुरबार l प्रतिनिधी
यूपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून त्यात नंदुरबार येथील जैनम महेंद्रकुमार तातेड (जैन) हा देशात १०३ वी रैंकिंगने उत्तीर्ण झाला आहे. 25 व्या वर्षी चौथ्या प्रयत्नात पास झाला.
यूपीएससीची परीक्षा गेल्या सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती. त्यासाठी १६ मे २०२३ ला मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून त्यात जैनम हा १०३ वी रैंकिंगने उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याला आयपीएसचा दर्जा मिळणार आहे. निकाल ऐकण्यासाठी काल सकाळपासूनच जैनम व त्याचा परिवार उत्सुकतेने वाट पाहत होते.
दुपारी दीडच्या सुमारास निकाल जाहीर होताच त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. संपूर्ण परिवार डीजेच्या तालावर थिरकला.नंदुरबार येथील जैनम जैन हा ड्रायफ्रुट व्यावसायिक महेंद्रकुमार व मंजूदेवी जैन यांचा सुपूत्र आहे.त्याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण चावरा स्कूलमध्ये झाले आहे तर पुणे येथील फर्ग्यूसन महाविद्यालयातून संख्याशास्त्र विषयातून पदवी पूर्ण केली आहे.यानंतर मात्र, युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली अन् वयाच्या २५ व्या वर्षी चौथ्या प्रयत्नात जैनमची दिल्ली वारी यशस्वी झाली.जैनम देशातून १०३ व्या रँकने युपीएससीमध्ये उत्तीर्ण झाला आहे.








