नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बालवीर चौक, नवाभोईवाडा परिसरातील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा भक्तीपूर्ण आणि उत्साहात पार पडला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूककीत भाविकांचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. सायंकाळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
नव्याने श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर उभारण्यात आले. या मंदिरात शिवलिंग, नंदी, हनुमान आणि गणपती मूर्ती स्थापित करण्यात आली. सकाळी कलशधारी कुमारीका आणि सुवासिनी महिलांच्या उपस्थितीत वाजत गाजत बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक .मोठा मारुती मंदिरापासून कुंभारवाडा, गवळीवाडा, नवा भोईवाडा मार्गे मूर्तींची मिरवणूक बालवीर चौकात पोहचली. पुरोहितांच्या साक्षीने जोडप्यांच्या उपस्थितीत विधीवतपणे पूजन करण्यात आले.
सायंकाळी सूर्यास्तानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ऍड. राम रघुवंशी आणि सौ. मेघा रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती
करण्यात आली. यावेळी माजी पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक किरण चौधरी, पत्रकार निलेश पवार,हिरालाल चौधरी,महादू हिरणवाळे, संजय भदाणे, ठेकेदार राहुल पाटील, यांच्यासह महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर महाप्रसाद (भंडारा) वाटपाने सोहळ्याचा समारोप झाला.
प्राणप्रतिष्ठा सोहळा यशस्वीतेसाठी श्री पिंपळेश्वर महादेव, हनुमान,गणेश मंदिर समितीचे कार्यकर्ते आणि परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.








