नंदुरबार l प्रतिनिधी
महिला व बाल विकास विभागातंर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नंदुरबार कार्यालयामार्फत शासन आपल्या दारी मोहिमेत शुभमंगल सामूहिक/नोदणीकृत विवाह योजना शासनाच्या विशेष पॅकेजमधून जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होवून आत्महत्या होवू नये यासाठी जिल्ह्यातील खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय (OBC Open) शेतकरी, शेतमजूर तसेच निराधार, विधवा, परितक्ता महिला यांच्यासाठी शासनाच्या विशेष पॅकेजमधून सामूहिक विवाह योजना राबविण्यात येणार असून जोडप्यास रुपये 10 हजार व संस्थेस जोडप्यामागे रुपये 20 हजार अनुदान देण्यात येणार आहे.
संस्थेने ही योजना राबवितांना कमीत कमी 5 वधु वरांचा गट करणे आवश्यक असून नोंदणीकृत विवाह (Ragistar Marriage) करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय (OBC व Open) दाम्पत्यांनी या योजनेव्दारा रुपये 10 हजार देण्यात येईल.
त्यामुळे ज्या नोंदणीकृत संस्था शुभमंगल सामुहिक / नोदणीकृत विवाह योजना राबविण्यासाठी उत्सुक असतील त्यांनी तसेच नोंदणीकृत विवाह (Ragistar Marriage) करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दाम्पत्यांनी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय मध्यवती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 226, टोकरतलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्र. 02564-210047 येथे संपर्क साधुन नमुना प्राप्त करुन प्रस्ताव सादर करावा, असेही श्री. बिरारी यांनी कळविले आहे.








