नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील शहर पोलिस ठाण्यासमोर अनोळखी महिला बेशुद्धावस्थेत असतांना ॲम्बूलन्समध्ये ठेवले या कारणावरुन पोलिस हवालदाराची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील शहर पोलिस ठाण्यासमोरील तालुका परेड ग्राऊंडवर रेल्वे कॉलनीच्या भिंतीजवळ एक ३० ते ३५ वर्षीय अनोळखी महिलेस पोहेकॉ.दिलवर शाम भिल यांनी उचलून ॲम्बूलन्समध्ये ठेवले. या कारणावरुन पोहेकॉ. दिलवर भिल यांना पंकज गजानन पाकले,
संदिप नाना पाटील, युवराज शंकर टेकनर यांनी शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की मेली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत पोहेकॉ. दिलवर भिल यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करीत आहेत.








