शहादा l का.प्र.
उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रकानुसर जी-20 अंतर्गत एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपची सभा मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्या नुसार ऊर्जा स्त्रोत संवर्धन आणि पर्यावरण पूरक जीवन शैली या विषयावर विविध कार्यकमाचे आयोजन करण्यास सूचित केले होते.तब्बल17 वर्षानंतर जी-20 शिखर बैठकीचे यजमानपद भारत 2023 साली भूषविणार असून त्याचे ब्रीदवाक्य “वसुधैव कुटुंबकम” -एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हे आहे. त्याअंतर्गत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाने विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा असल्याने ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे आयोजन केले.
जी-20 अंतर्गत एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या सभेत ऊर्जेचे मर्यादित स्त्रोत लक्षात घेऊन भविष्यातील धोका याकडे समाजाचे लक्ष वेधणे आवश्यक असल्याने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने ऊर्जा स्त्रोत संवर्धन आणि पर्यावरणपूर्वक जीवनशैली या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रमात राज्यभरातून 400 हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला व सर्वांना सहभाग प्रमाणपत्र ई-मेल द्वारे देण्यात आले. सदर प्रश्नमंजुषेमध्ये 2023 चे जी- 20 सभेचे आयोजन कोणत्या राष्ट्रांकडे आहे,त्याचे ब्रीदवाक्य काय आहे, भारतातील संपूर्ण, सोलर पॉवर विमानतळ कोणते, विविध ऊर्जा स्त्रोत यासारखे प्रश्न दिलेले होते.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील,प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, उपप्राचार्य प्रा. एम. के. पटेल, डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. प्रश्नमंजुषेतील प्रश्नावली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. वर्षा चौधरी व डॉ. वजीह अशहर यांनी तयार केली. डॉ. अशहर यांनी सर्वांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणेसाठी परिश्रम घेतले.








