Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त जनजागृती सप्ताह : रघुनाथ गावडे

team by team
May 21, 2023
in राष्ट्रीय
0
जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त जनजागृती सप्ताह : रघुनाथ गावडे
नंदुरबार-
जागतिक पातळीवर दिनांक २८ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनाची थिम आम्ही कटीबध्द आहोत ही आहे. या दिनाचे औचित्य साधून दिनांक २२ मे ते २८ मे या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे, अशी माहिती नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  रघुनाथ गावडे यांनी दिली आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत शाश्वत  स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावित यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत . मासिक पाळी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे . मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी-परंपरांमुळे मुली-महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.  या पार्श्वभूमीवर या दिनाच्या औचित्य साधून जिल्हयात चर्चासत्रे, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आदी उपक्रमाच्या माध्यमातून   जनजागृती करण्यात येणार आहे.
 सप्ताह कालावधीत महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबींना केंद्रस्थानी ठेवून जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग, उमेद तसेच विविध घटकांचा समन्वय साधून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तरी सर्व ग्राम पंचायतीमधून अशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, शिक्षिका, महिला बचत गट यांनी पुढाकार घेवून मोठया प्रमाणत या सप्ताह निमित्त मासिक पाळी व्यवस्थापन व आरोग्याची काळजी या विषयावर महिला व किशोरवयीन मुलींना  माहिती देवून जनजागृती करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नर्सेस संघटनेतर्फे सेवानिवृत्त परीचारीकांचा सत्कार

Next Post

रासेयोतर्फे ऊर्जा स्रोतांच्या संवर्धन व पर्यावरण पुरक जीवनशैली विषयी जनजागृती

Next Post
कबचौ उमविकडून पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या  कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास अंकेक्षणात ‘अ’ दर्जा प्राप्त

रासेयोतर्फे ऊर्जा स्रोतांच्या संवर्धन व पर्यावरण पुरक जीवनशैली विषयी जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add