अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुका शेतकरी सह.संघ मर्यादितच्या चेअरमन पदी पृथ्वीसिंह उदेसिंह पाडवी यांची तर व्हाईस चेअरमन पदी अशोक दौलतसिंग पाडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

शेतकरी सह.संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची पहिली सभा शेतकरी सह.संघाच्या कार्यालयात पार पडली.यावेळी चेअरमन पदासाठी पृथ्वीसिंह उदेसिंह पाडवी यांचा व व्हाईस चेअरमन पदासाठी अशोक दौलतसिंग पाडवी यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बी.बी.अहिरे यांनी पृथ्वीसिंह पाडवी यांची चेअरमन व अशोक दौलतसिंग पाडवी यांची व्हाईस चेअरमन म्हणुन बिनविरोध निवड घोषित केली.
यावेळी शेतकरी सह.संघाचे नवनिर्वाचित संचालक तसेच विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी, संचालक जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, लक्ष्मण वाडीले,टेडग्या वसावे, विक्रमसिंह चंद्रवंशी, महावीर डागा, नटवरलाल पाडवी, भिमसिंग तडवी आदी संचालक उपस्थित होते.यावेळी संघाचे व्यवस्थापक मुकेश पटेल उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यानी अक्कलकुवा शहरात फटाके फोडुन आनंद व्यक्त करीत नवनिर्वाचित चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, व्हा चेअरमन अशोक पाडवी यांना पेढे भरवुन शुभेच्छा दिल्या.








