नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीतील नऊ रिक्त जागांवर पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून, पावला,पाचोराबारी येथील प्रत्येकी २ सदस्य उमेदवार शिवसेनेच्या शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. त्यांच्या सत्कार संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
नंदुरबार तालुक्यातील पावला,पाचोराबारी, पिंपरी,नवागाव,उमरदे बुद्रुक,नटावद या ६ ग्रामपंचायती मधील ९ रिक्त झालेल्या सदस्य पदासाठी गुरुवारी मतदान झाले होते. गुरुवारी तहसीलदार कार्यालयात घेण्यात आलेल्या मतमोजणीत निकाल जाहीर करण्यात आला त्यात पावला येथील प्रभाग क्र. १ मधून प्रमिला वळवी, प्रभाग क्र.२ मधून ममता वळवी तसेच पाचोराबारी प्रभाग क्रमांक ३ मधील शांताबाई पटेल व प्रियांका राठोड विजय झाले. विजयी उमेदवारांच्या सत्कार शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंग वळवी,संचालक किशोर पाटील, पावला ग्रामपंचायतलतीचा सरपंच भानुमती वळवी,उपसरपंच सावित्री पाडवी, माजी सरपंच देवेंद्र वळवी, माजी सदस्य मंगेश पाडवी,ब्रिजलाल वळवी,अजय पाडवी,जयेश वडवी, ईश्वर वळवी, नरोत्तम वळवी, पाचोराबारीचा सरपंच प्रिया पाडवी, उपसरपंच सुदर्शन राठोड, माजी उपसरपंच मांगीलाल राठोड,माजी सरपंच राघो वळवी, संजय पटेल वशीबाई वळवी, राजेंद्र पटेल,काशिनाथ पटेल, अल्पेश पटेल आदी उपस्थित होते.








