नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान समित्यांचे गठण पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना केली असून जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.
नंदुरबार तालुकाध्यक्षपदी प्रविण वसंत पाटील (शनिमांडळ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकानिहाय समिती पुढील प्रमाणे- नंदुरबार तालुका अध्यक्ष प्रविण वसंत पाटील रा. शनिमांडळ ता. नंदुरबार, सदस्य दिनेश गोरजी गावित वाघशेपा पो. कोठली ता. नंदुरबार, संगिता तुकाराम सोनवणे नंदुरबार, विनोद रमण वानखेडे कोपर्ली, गजानन भिका पाटील भालेर राजेश नामदेव चौधरी नंदुरबार, जगदिश नाना पाटील जूनमोहिदे, राजेश जालम्या भिल खामगाव, शांतीलाल लहू मिस्तरी न्याहली यांची निवड करण्यात आली आहे.








