Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गंभीर बाब :गर्भवती महिलेस रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती

team by team
May 19, 2023
in क्राईम
0
गंभीर बाब :गर्भवती महिलेस रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात धडगाव तालुक्यातील गर्भवती महिलेस रुग्णवाहिका मधून घेवून जात असताना सदर गाडी हातोडा पुलवरच पंक्चर झाली.त्यामुळे सदर महिलेची गाडीतच प्रसूती झाली.यात महिला व नवजात बाल सुरक्षित असले तरी आरोग्य यंत्रणा किती सुसज्ज आहे.याची प्रचीती नातेवाईकांना आली आहे.साहजिकच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा बाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या बाबत अधिक माहिती अधिक की,धडगाव तालुक्यातील शेंदवणे येथील महिलेस प्रसूती पूर्व कळा येवू लागल्याने तिला काल सकाळी बिलगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तथापि सदर महिलेस अधिक त्रास होत असल्याने तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रिफर करण्यात आले. त्यामुळे त्या महिलेला रुग्णवाहिका मधून जिल्हा रुग्णालयात नेत असताना तळोदा नजीकच्या हातोडा पुलावर रुग्णवाहिके चे चाक पंक्चर झाले परंतु यत्रनेने नंदुरबार हून दुसरी रुग्णवाहिका बोलवली होती ही रुग्णवाहिका सदर ठिकाणी पोहचे पर्यंत गर्भवती महिलेला अधिक कळा येत असल्याने गाडीतच तिची प्रसूती झाली.

या महिलेची प्रसूती सुरक्षित झाल्याने तिच्या बरोबर नवजात बालक ही सुरक्षित असले तरी नंदुरबार जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा किती सुसज्ज आहे हे ह्या घटनेवरून दिसून येते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा भंगार व जुनाट रुग्णवाहिकामुळे आदिवासी महिलेची भर उन्हात गाडीतच प्रसूती होण्याची वेळ आल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणे बाबत नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या महिलेला पुढील उपचारासाठी दुसऱ्या अंबुलल्स ने जिल्हा आरोग्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तिची प्रसृती डॉ. अंजली अग्रवाल यांनी केली. वास्तविक ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना पुरविण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका सुसज्ज ठेवणे अपेक्षित आहे जे ने करून गंभीर रुग्ण अथवा गर्भवती महिलांना पुढील आरोग्य सुविधा चांगल्या मिळणे गरजेचे आहे.परंतु आरोग्य विभागाच्या या रुग्णवाहिका अक्षरशः मुर्दाड झाल्या आहे. जिल्हा प्रशासन च्या प्रशासनाने या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चांगल्या दर्जाच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामीण जनतेमधून होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार, वारसांना आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाखांचा धनादेश वितरीत

Next Post

संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या नंदूरबार तालुकाध्यक्ष पदी प्रविण पाटील तर सदस्य पदी गजानन पाटील यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add