Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा पोलीस ठाण्यातर्फे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन, एकाच दिवसात तब्बल 116 तक्रारींचे निवारण

team by team
May 17, 2023
in क्राईम
0
तळोदा पोलीस ठाण्यातर्फे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन, एकाच दिवसात तब्बल 116 तक्रारींचे निवारण
नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा पोलीस ठाण्यातर्फे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.यात एकाच दिवसात तब्बल 116 तक्रारींचे निवारण करण्यात आले.
 पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे निरसन करण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या मनातील पोलीसांविषयी भिती दूर होऊन पोलीस व जनता संबंध वृध्दींगत व्हावे यासाठी दि. 17 मे रोजी तळोदा पोलीस ठाण्याच्या आवारात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सदर जनता दरबाराचे उद्घाटन जनता दरबारसाठी उपस्थित असलेल्या वयोवृध्द् महिला मायाबाई मंगा वळवी रा. बुधावली ता. तळोदा यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, महिला सहायता कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक धनराज निळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक  अमितकुमार बागुल, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांच्यासह इतर अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच तळोदा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी  सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सामान्य नागरिकांनी त्यांना कार्यालयात भेटून त्यांच्या कौटुंबीक, शेतजमीनी विषयी, गुन्ह्यांशी संबंधीत व इतर समस्या / तक्रारी मांडत होते परंतु कार्यालयात बसून त्यांना तक्रारींचे निरसन करता येत नव्हते. पोलीस विभागाचे कामकाज अतिशय व्यस्त असते कधी कायदा व सुव्यवस्था तर कधी गुन्हे तपास तसेच दैनंदिन कामकाज त्यातच एखादा सामान्य नागरिक त्याची तक्रार किंवा समस्या घेऊन पोलीस ठाण्याला आला तर व्यस्त कामकाजामुळे पोलीसांकडून त्याची समस्या किंवा तक्रारीचे समाधान होण्यास विलंब होत होता. पोलीस विभागाकडून सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे समाधान करण्यासाठी तसेच त्याला न्याय देण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तक्रारदारांचे समाधान करण्यासाठी व सर्व सामान्य नागरिकांना सर्व एकाच ठिकाणी मदत उपलब्ध व्हावी हा असून नागरिकांचा वेळ वाया जावू नये हा आजचा पोलीस व जनता दरबार घेण्यामागील मुख्य उद्देश होता. तसेच नागरिकांनी कोणाच्याही दबावाखाली न येता तक्रार देण्याचे टाळू नये. नागरिकांच्या काही तक्रारी किंवा समस्या असतील तर त्यांनी कसलीही भिती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या जनता दरबारासाठी तळोदा तालुका व परिसरातील सुमारे 600 पुरुष व स्त्रीया उपस्थित होते. सामान्य नागरिकांच्या समस्या / तक्रारी स्वतः नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ऐकुन त्यावर तातडीने निर्णय घेऊन तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन केले. नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नागरिकांच्या समस्या ऐकुन त्यावर तातडीने निर्णय घेऊन “जनता दरबार” या अभिनव उपक्रमाची सुरुवात मागील वर्षी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून केली होती.
पती पत्नीच्या भांडणातून वाद झालेल्या 9 दाम्पत्यांचा जनता दरबारामध्ये समझोता घडवून आणण्यात आला व नऊ दाम्पत्यांचे मनोमिलन करण्यात यश मिळविले. त्यामुळे पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांनी नऊ दाम्पत्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच संजय उत्तम पटले व श्रीमती संगीता संजय पटले रा. श्रेयस कॉलनी तळोदा या भाऊ बहिणींचा वडीलोपार्जीत शेतजमीनीचा जुना वाद देखील जनता दरबारमध्ये मिटविण्यात आला. तसेच रतिलाल गबा माळी व बापू पारधी यांच्या शेतातील रस्त्यावरून वाद होवून त्यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. रतिलाल माळी व बापू पारधी यांच्यात समझोता करुन त्यांच्यातील वाद हा जनता दरबारामध्ये सोडविण्यात आला.
सदर जनता दरबारमध्ये कौटुंबीक वादाच्या 31 तक्रारी, शेत जमीनीविषयी 1 तक्रार, दिवाणी वाद-36 तक्रारी, किरकोळ भांडण व मारामारी 49 तक्रारी, महिला संबंधी 12 असे एकुण 129 तक्रारी मांडण्यात आल्या
होत्या. त्यापैकी 116 तक्रारदारांच्या तक्रारींचे जनता दरबारामध्ये निरसन करण्यात पोलीसांना यश आले. यातील बहुतांशी तक्रारी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्वत: हाताळल्या.
सदर कार्यक्रमाची प्रास्तावीक व सुत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक  संदीप पाटील यांनी केले. तसेच भविष्यातही अशा प्रकारचे जनता दरबार नंदुरबार जिल्ह्यातील इतर पोलीस ठाणे हद्दीत लवकरच भरविण्यात येतील असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद पोलिसांतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथ संचलन

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गैरव्यवहार, कारवाईची भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गैरव्यवहार, कारवाईची भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गैरव्यवहार, कारवाईची भाजपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add