नंदुरबार l प्रतिनिधी
भारतातील तरुणींचे होणारे शोषण मानसिक छळ प्रेमातून होणारी फसवणूक अशा विविध पैलू मांडणारा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात आला आहे चित्रपट पाहण्यासाठी विशेषतः महिला व मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
तर महिला व मुलींमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शनिवारी ७ वाजेला डॉ. विक्रांत मोरे व भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष मिलिंद मोहिते व भाजपा युवा मोर्चा यांच्यातर्फे अमर सिनेमा येथे मुली व महिलांसाठी मोफत शोचे आयोजन करण्यात आले.

यावेळी खा डॉ हिना गावित,जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांनी सर्व मुली महिलांन समवेत बसून चित्रपट पाहिला दरम्यान चित्रपट पहायला आलेले खा. डॉ हिना गावित व डॉ सुप्रिया गावित तसेच संपूर्ण महिला वर्गा यांच्यावर भाजपा युवा मोर्चा तर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी नगरसेविका भावना गुरव नगरसेवक चारुदत्त कळवणकर, प्रशांत चौधरी ,संतोष वसईकर ,लक्ष्मण माळी आदी उपस्थित होते.








