Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर

team by team
May 12, 2023
in क्राईम
0
बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर
नंदूरबार l प्रतिनिधी
बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी निमित्त नंदुरबार येथे आले होते. त्यांनी मांडलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या संकल्पनेची सुरूवात नंदुरबार जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात गांजा, अफु इत्यादी प्रकारच्या अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड, विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, तंबाखूजन्य व अमंली पदार्थांचे सेवन केल्याने त्याचे स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात. अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो. तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहून नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत.
तसेच नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह ही अत्यंत गंभीर समस्या असून बालविवाहामुळे बालकांच्या विशेषतः मुलींच्या आयुष्यावर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह या समस्येचे समूळ उच्चाटन झाले तर बालविवाहामुळे होणाऱ्या इतर आरोग्याच्या समस्या या देखील कमी होण्यास मदत होईल. या निरामय भावनेने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला आहे.
 पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी “ऑपरेशन अक्षता” यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होवून बाल विवाह रोखण्याची जबाबदारी पार पाडावी तसेच महिलांसंबंधी घडणाऱ्या कौटुंबीक हिंसाचाराच्या व अन्य अत्याचाराच्या घटनांविषयी सजगता निर्माण व्हावी यासाठी शेवटच्या समाज घटकापर्यंत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात गाव पातळीवर काम करणारे महत्वाचे घटक सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचादेखील सहभाग या उपक्रमात करून घेण्यात आला आहे. समाज घटकातील प्रत्येकाने जबाबदारी ओळखून गावात विवाह प्रतिबंधाबद्दल जनजागृती करुन या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.
तसेच पालकांनी अल्पवयीन मुलगी किंवा मुलगा यांचा बालविवाह न करता त्यांना उच्चतम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा विवाह करावा. बालविवाहामुळे महिलांवर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह करणाऱ्या पालकांना तसेच विवाहात हजर असलेल्या नातेवाईकांना दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात. तसेच आपल्या परिसरात होणाऱ्या बालविवाहाबाबत अक्षता समितीचे सदस्य पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा बीट अंमलदार यांना सूचीत करावे.
या दोन्ही उपक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन आहे की, बालविवाह व अंमली पदार्थांसंदर्भात काही माहिती असल्यास तात्काळ आपले मोबाईल फोनवरून 9022455414 अथवा टोल फ्री क्रमांक 112 या क्रमांकावर द्यावी. सदरचे क्रमांक हे 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा बाजार समितीच्या सभापती पदी आ. आमश्या पाडवी यांची बिनविरोध निवड

Next Post

आरोग्य,शिक्षण आणि कृषी विषयांवर नंदुरबार येथे शैक्षणिक परिषद उत्साहात

Next Post
आरोग्य,शिक्षण आणि कृषी विषयांवर नंदुरबार येथे शैक्षणिक परिषद उत्साहात

आरोग्य,शिक्षण आणि कृषी विषयांवर नंदुरबार येथे शैक्षणिक परिषद उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add