नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दिनेश बबन देवरे यांना पोस्ट डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. डॉ.प्रा.देवरे यांचे ३६० बॅक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लोटस वर्ल्ड रेकॉर्ड, आयसीएस वर्ल्ड रेकॉर्ड, ३६० जेनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यात आले आहे.
डॉ.देवरे यांना १२६ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, २५ गोल्ड मेडल, १९०० राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय जनरलमध्ये पेपर प्रकाशित करण्यात आले आहेत. प्रा.डॉ.दिनेश देवरे हे संपूर्ण खान्देशातून एकमेव पोस्ट डॉक्टरेट प्राध्यापक झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड.रमणभाई शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, प्राचार्या सुषमा शाह आदींनी त्यांचा गौरव केला आहे.