Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता

team by team
May 9, 2023
in राज्य
0
अरे बापरे : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता
नंदुरबार l प्रतिनिधी
वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली असून कमाल तापमान येत्या काही दिवसात ४२ ते ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आली.
कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवस तापमान जास्त राहील. कमाल तापमानात वाढ होऊन पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात वाढ होत असल्याने शेतकरी बंधूंनी उन्हाळी भुईमूग,
बाजरी, मूग, तीळ इत्यादी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी देण्यासाठी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी. जेणेकरून पिकांना उष्म्याचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील.
फळ झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा ज्यामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्तवेळ टिकून राहील. फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, केळी व पपईसारख्या फळांचे उन्हापासून बचाव करण्यासाठी पिशवीने फळे झाकून घ्यावीत. वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा पोते पाण्याने भिजवून शरीरावर बांधावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, लोकांनी पुढील काही दिवस विशेषतः दुपारी १२ ते ४ या काळात थेट उन्हात जाणे टाळावे, शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवून मुबलक प्रमाणात कालांतराने पाणी प्यावे, अशी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार पालिकेने 46 दुकानांना केले सिल

Next Post

जिल्ह्यात मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांची सुविधा उपलब्ध करा,मराठा समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add