नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील गिरीविहार कॉम्प्लेक्स च्या सुमारे 46 दुकानांना थकबाकी पोटी पालिकेमार्फत सील लावण्यात आले त्यावेळी मुख्याधिकारी स्वतः उपस्थित होते. या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कर्मचाऱ्यांनी स्वतः दुकानांना कुलूप लावून सिल केले. तसेच शहरातील विविध सर्कलचा काही भाग कमी करून परिसर मोकळा केला. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
नंदुरबार पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी पुलकीत सिंह यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी शहरातील अनाधिकृत बांधकामांवर हातोडा घालत अतिक्रमण हटविण्याचा सपाटाच लावला असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी असलेले अतिक्रमण मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी हटविले आहे. आज मुख्याधिकारी तथा प्रशासक पुलकित सिंह यांच्या आदेशाने नंदुरबार शहरातील गिरीविहार कॉम्प्लेक्स च्या सुमारे 46 दुकानांना थकबाकी पोटी पालिकेमार्फत सील लावण्यात आले त्यावेळी मुख्याधिकारी स्वतः उपस्थित होते या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कर्मचाऱ्यांनी स्वतः दुकानांना कुलूप लावून सिल केले. जोपर्यंत थकबाकी व्याजासह वाहन भाडे भरणार नाही तोपर्यंत हे दुकाने सिल राहतील तसेच निवासी मालमत्ता यांचा कर भरणे आवश्यक आहे.अन्यथा सदर निवासी मालमत्ता सुध्दा सिल बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे मुख्याधिकारी तथा प्रशासक पुलकित सिंह (भा.प्र.से) यांनी सांगीतले आहे.
दरम्यान नंदुरबार नगर परिषद हद्दीतील बाहय वळण रस्त्यावर नवापूर चौफुली, धुळे चौफुली, करणी येथे सर्कलचे बांधकाम करून सुशोभीकरण करण्यात आलेले होते. सदरील ठिकाणी वर्दळ वाढल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. जिल्हाधिकारी कार्यालयात जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्याच्या विकासाची विषयाच्या संपन्न झालेल्या बैठकीत व पालकमंत्री ना. विजयकुमार गावित,खा. डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार नगर परिषदेत घेतलेल्या आढावा बैठकीत सदरील विषयावर चर्चा झाली. आढावा बैठकीत शहरातील वाहतुकीस अडचण होणा-या ठिकाणचे बांधकाम हटविण्याचे निर्देश देण्यात आले. नंदुरबार नगरपरिषदे तर्फे नवापूर चौफुली व धुळे चौफुली वरील सर्कलचे बाहय भागाचे बांधकाम तोडण्यात आले.
धुळे रोडवरील सर्कलमधील गजलक्ष्मी मुर्ती व नवापूर चौफुली सर्कलमधील स्व. इंदिरा गांधी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमा तशाच ठेवण्यात आल्यात, दोन्ही सर्कल आकाराने लहान झाल्याने, चौफुलीवरील सर्कलचे व्यास ६ मीटर ने तर नवापूर चौफुली सर्कल चे व्यास ६५० मीटर ने कमी झाल्याने सदरील चौफुलींवरील रस्त्याची रुंदी वाढल्याने या ठिकाणी वाहतुक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
आज शहरातील करण चौफुली वरील सर्कलच्या बाहय भागाचे बांधकाम हटविण्यात आले. सर्कल मधिल अशोकचक्राची प्रतिकृती तशीच ठेवण्यात आलेली आहे. बाहयभागाचे बांधकाम तोडण्यात आल्याने सर्कलचे व्यास ८.०० मी. ने कमी झाल्याने चौफुलीचे रस्ते रुंद होणार असल्याने वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असल्याचे मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी सांगितले आहे