Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रवासी तिकिट तपासणी पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ – मनीषा सपकाळ

team by team
September 22, 2021
in क्राईम
0
प्रवासी तिकिट तपासणी पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ – मनीषा सपकाळ

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय कार्यालयातर्फे सर्व आगाराअंतर्गत दि.22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर पर्यंत प्रवासी तिकिट तपासणी मोहीम अभियान राबविण्यात येत आहे.अशी माहिती विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि.22 सप्टेंबर पासून प्रवासी तिकीट तपासणी मोहीम पंधरवाडा सुरू करण्यात आला आहे.त्यानुसार धुळे विभागातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, दोंडाईचा, साक्री, शिरपूर, आणि धुळे आगारातील सर्व बसेस मधील प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये या बाबींना आळा घालण्याकरीता मोहीम राबविण्यात येत आहे.प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबवितांना बस स्थानकावर उतरणार्‍या प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात येईल.बस स्थानकावर आलेल्या स्वतःच्या व इतर विभागाच्या सर्व बसची तपासणी करण्यात येईल.मोहीम राबविताना आगारातील सर्व पर्यवेक्षीय कर्मचारी यांचा समावेश राहणार असून तपासणी करणारे पर्यवेक्षक  संपूर्ण कालावधीत गणवेशातच तपासणी करतील.राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी  आपली तिकिटे काळजीपूर्वक जपून ठेवावीत.मोटार वाहन कायदा 1988 नुसार विनातिकीट प्रवास करणार्‍या व्यक्तींकडून त्यांनी चूकविलेल्या प्रवास भाड्या व्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये शंभर यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल.असेदेखील विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी पत्रातून म्हटले आहे.दि.22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत प्रवासी तिकिट तपासणी अभियान पंधरवडा सुरू राहणार असल्याचे नंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत भामरे बंधुंनी मिळविली पदके

Next Post

प्रा.सरदार पावरा यांना कर्तृत्वान शिक्षक पुरस्कार

Next Post
प्रा.सरदार पावरा यांना कर्तृत्वान शिक्षक पुरस्कार

प्रा.सरदार पावरा यांना कर्तृत्वान शिक्षक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add