नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील एकता नगरात वडीलांना काठीने मारहाण केल्याप्रकरणी आईसह मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील एकता नगरातील दंगल चैतराम ऐसी यांच्या घरात त्यांचा मुलगा श्रावण दंगल ऐसी याने सामान टाकला. याबाबत दंगल ऐसी यांनी विचारणा केली असता याचा राग आल्याने दंगल ऐसी यांना पत्नी धरमीबाई दंगल ऐसी हिने पकडून ठेवले.
तर श्रावण ऐसी याने काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत दमबाजी केली. याबाबत चैतराम ऐसी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दिलीप सुर्यवंशी करीत आहेत.








