Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : विशेष पोलीस महानिरक्षक व नवापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत देशीविदेशी मद्यसाठ्यासह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त, 15 जणांना अटक

team by team
April 17, 2023
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : विशेष पोलीस महानिरक्षक व नवापूर पोलिसांच्या  संयुक्त कारवाईत देशीविदेशी मद्यसाठ्यासह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त, 15 जणांना अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नाशिक येथील विशेष पोलीस महानिरक्षकांचे पथक व नवापूर पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करुन ५ लाख ६९ हजार १०५ रुपयांचा देशीविदेशी मद्यसाठा, २ लाख ७८ हजार ३९० रुपयांच्या रोकडसह ८९ लाख २ हजार ४९५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

 

याप्रकरणी १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील विशेष महानिरीक्षकांच्या पथकासह नवापूर पोलिसांनी नवापूर येथील गणेशहिल परीसरात जावून रात्री 8.30 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे सुमारे ५ लाख ६९ हजार १०५ रुपये किमतीचा विदेशी दारु, बिअर प्रोव्हीशन गुन्ह्याचा माल, २ लाख ७८ हजार ३९० रुपयांची रोकड, ७८ लाख रुपये किमतीचे १७ चारचाकी वाहने, २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या ९ मोटरसायकली असा एकुण ८९ लाख २ हजार ४९५ रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.

पथकाने तेथे छापा टाकला असता कौशिक सुरेशभाई पटेल, पंकजभाई ईश्वरभाई पटेल, शाम अचल माजी, अंगतसिंह दिनेशसिंह भदौरिया, प्रतीक सुमनभाई पटेल,, अखिलेश शिवदान सिंहभदौरिया, अनिलसिंह सुरेंद्रसिंह भदौरिया, सामंतसिंह शिवपालसिंह भदौरिया, सुरजकुमार हाकिम सिंह, जितेंद्रसिंह समशेरसिंह भदौरिया,
पुट्टसिंग भदौरिया, कृष्णकुमारसिंह शिवदानसिंह भदौरिया, शामसिंह रामप्रसादसिंह भदौरिया, शिवप्रताप तिलकसिंह भदौरिया, अजीत पवार लोखंडे व नवापूर येथील गणेश हिल परिसरातील रहिवासी असलेले दोन विधीसंघर्षीत बालक यांनी संगनमत करुन विनापरवाना बेकायदा गुन्ह्याचा माल (मद्य) बेकायदेशीररित्या गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्जात बाळगला.

 

 

त्याचा साठा करुन तो पिकअप व इन्व्होवा कारमध्ये भरतांना मिळून आले आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून घटनास्थळी मिळून आलेल्या चारचाकी १७ वाहनापैकी १५ वाहनांचे सिट दारु वाहतुकीसाठी कारण्यात आलेले आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहेत.

 

सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश भटू पाटील, उपनिरीक्षक रविंद्र ईश्वर शिलावट, बशीर गुलाब तडवी, पो.हवालदार शेख शकील अहमद, पो.ना. प्रमोद सोनु मंडलीक, पो.ना. मनोज अशोक दुसाने, चा.पो.शि. नारायण कचरु लोहरे, नवापूर पोलीस स्टेशनचे पोनि ज्ञानेश्वर वारे, पोउनि अशोक मोकळ, असई युवराजसिंग परदेशी, पोशि परमानंद काळे, पोशि रणजित महाले यांच्या पथकाने केली आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

कोंडाईबारी घाटात बस, ट्रक व ट्रेलरचा अपघात, सात प्रवासी जखमी

Next Post

तळोदा बाजार समितीत आ. राजेश पाडवी यांची बिनविरोध निवड

Next Post
तळोदा बाजार समितीत आ. राजेश पाडवी यांची बिनविरोध निवड

तळोदा बाजार समितीत आ. राजेश पाडवी यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add