Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रक्तदान करुन दिला महापुरुषांच्या कार्याला उजाळा

team by team
April 15, 2023
in सामाजिक
0
रक्तदान करुन दिला महापुरुषांच्या कार्याला उजाळा

नंदूरबार l प्रतिनिधी

हिरकणी फाउंडेशन, नंदुरबारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नटखट प्ले स्कुल, कोकणी हिल नंदुरबार येथे रक्तदान शिबीर, रांगोळी स्पर्धा व प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.गणेश पाटील तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून चंद्रशेखर चौधरी हे उपस्थित होते.

 

 

 

मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालय येथील डॉ.सोनाली कुलकर्णी, डॉ.मोनिका वसावे, डॉ.रमा वाडीकर तसेच हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.चेतना गोस्वामी, उपाध्यक्षा सौ.प्रियंका पटेल, सौ.संगिता वाघ, सौ.उज्वला गावीत, सौ.आरती पाटील, सौ.कल्पना पाटील, सौ.निता मराठे तसेच देवेंद्र कासार, राहुल शिंदे, प्रणव पवार, हर्षल मिस्तरी आदी उपस्थित होते. यावेळी खुशी पानपाटील, खुशी सोनवणे तसेच मयुरी पवार या विद्यार्थीनींनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रा.गणेश पाटील यांनी म.फुले व डॉ.आंबेडकर यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले. व आजच्या रक्तदान शिबीरातून दोन्ही महामानवांना श्रध्दांजली  दिली जात आहे, असे सांगितले.

 

 

रांगोळी स्पर्धेत एकुण १६ महिलांनी व मुलींनी सहभाग घेतला. यात चेतना प्रविण माळी (प्रथम), माधवी भिमराव कापुरे (द्वितीय) तर रुपाली अमोल पिंपळे (तृतीय) यांनी यश संपादन केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. यानंतर झालेल्या रक्तदान शिबीरात ७ ते ८ महिलांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवारंग फाउंडेशनचे जितेंद्र लुळे यांनी केले. तर प्रास्तविक चेतना गोस्वामी यांनी मांडले. आभार संगिता वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हिरकणी फाउंडेशन, युवारंग फाउंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा स्टाफ यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शेततळे अस्तरीकरणातून बागायत फळपीक लागवड

Next Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Next Post
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add