नंदूरबार l प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती निमित्त नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे लहान मुला मुलींना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत शैक्षणिक साहित्य वाटप करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब नेहमी सांगायचे की जो शकेल तोच टिकेल, त्यामुळे शिक्षण हे प्रत्येक नागरिकांनी घेतलं पाहिजे, शिक्षण हे वाघिणीचे दूध असतं, मात्र अनेक मंडळांकडून डीजे, ढोल ताशे वाद्य वाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात असते परंतु कोळदा या गावातील भीम अनुयायांनी बाबासाहेबांच्या आदर्शच्या विचार करत लहान मुला मुलींना शिक्षणाचे साहित्य वाटप करून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.
लहान मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावाच्या सरपंच मोनिताई वळवी, ग्रामपंचायतचे सदस्य श्वेताताई गवळी, ग्रामसेवक संजय देवरे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, सामाजिक कार्यकर्ता किरण गवळी यांच्यासोबत गावातील मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते.