नंदुरबार l प्रतिनिधी
बीएस-४ अर्थात भारतीय संविधान सम्मान सुरक्षा संवर्धन राष्ट्रव्यापी महाजनजागरण अभियान अंतर्गत राष्ट्रपिता जोतीराव फुले व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त गुरुवार १३ एप्रिल २०२३ रोजी बामसेफ व सहयोगी संघटना यांच्यामार्फत मूलनिवासी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते यांनी केले. तसेच दि.१४ एप्रिल रोजी संविधान कार्यान्वयन चेतना रॅली काढण्यात आली.
मूलनिवासी मेळाव्यात सभ्यता व कलाचार कार्यक्रमात फुले-आंबेडकरी आंदोलनाची गीते व नाटीका सादर करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या रोलबॉल स्पर्धेत दोन वेळा सुवर्ण पदक विजेत्या साची शिरसाठ हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनीच सहभाग घेतला होता. त्यात सिध्दांत सामुद्रे, जयअंश म्हसदे, दिशा पानपाटील, मंयुरी पवार, काव्यांजली पवार, खुशबू वाघ, मालती मोरे, रेखा तायडे, उषा जाधव, विद्या पानपाटील, मेघा जाधव, सुनिता पवार, अशूल, अनुष्का बागले, अस्मिता मोहिते, आराध्या जाधव, रौनक हिरकणे, मालती मोहिते, संगिता पवार, दिशा सैंदाणे, जयश्री पानपाटील, प्रिती बेडसे, शुभांगी बागले, रंजिता हिरकणे, रुपाली पिंपळे, गार्गी पिंपळे, संगिता म्हसदे, मेघा पवार, शोभा ढोढरे, मनिषा ठाकरे, अश्विनी पवार, निधी तायडे, खुशी थोरात, खुशी पानपाटील, मेघा जाधव, हर्षदा मोरे, प्रियंका ठाकरे, हितांक्षी सोनवणे, चेतन अहिरे आदी महिला व बाल कलाकारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन संगीता व धनंजय वाघ यांनी सलग एक महिना मेहनत घेऊन केले. सुत्रसंचलन संगिता वाघ यांनी तर आभार प्रविण खरे यांनी मानले. कार्यक्रमास हजाराेंच्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता.
दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी संविधान कार्यान्वयन चेतना रॅली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन व संविधान गौरव गीत गायन करून रॅलीस सुरुवात झाली, संजय टाऊन हॉल धवश्या तकिया मार्गे राष्ट्रनिर्माते बाबासाहेब डॉ भिमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व संविधान गौरव गीत गायन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत शेकडोंनी जनसमुदाय सहभागी झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पावबा ठाकरे, दिपक पानपाटील, प्रशांत साळवे, निखिल चित्ते अमोल पिंपळे, प्रमोद निकुंभे, रविशंकर सामुद्रे , विजय शिरसाठ, गौतम भामरे, बि एस पवार, ललिता शिरसाठ, परमेश्वर मोरे, संजय जाधव, गोरखनाथ बिरारे, हेमकांत मोरे, संतोष नागमल तसेच कोकणी हिल परिसरातील नागरिकांनी मेहनत घेतली.