नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार विकास गटातील नंदुरबार तालुक्यातील उमर्दे बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पदोन्नती मुख्याध्यापक संदीप रायते यांनी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवली. तसेच अनेक पदोन्नती मिळवल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना २९ मार्च २०२३ रोजी त्यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पदोन्नती मुख्याध्यापक संदीप रायते यांना ६ डिसेंबर २०२२ रोजी पदोन्नती समितीने दिव्यांग अल्पदृष्टी प्रवर्गात निवड केली होती. मात्र या निवडीवर अनेकांनी आक्षेप घेत शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. ए
वढेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिकाही दाखल करण्यात आली होती.
वसंत जाधव यांच्यासह दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आरती बाविस्कर यांनी तक्रार केली होती. दरम्यान, जे. जे. रुग्णालयात त्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली. यात दिव्यांग अल्पदृष्टीचे प्रमाण शून्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबनाचे आदेश देण्यात आले असून, ७ फेब्रुवारी २०१८ रोजी धुळ्यातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अल्प दृष्टी दिव्यांगाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. याच बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे दिव्यांगाची नोकरी, पदोन्नतीचा लाभ घेतला होता.२१ मार्च ते ५ एप्रिल २०२३ दरम्यान रजेवर होते. पदोन्नती मुख्याध्यापक रायते यांनी ६ एप्रिल रोजी सेवेत रुजू होताच त्यांना निलंबनाचे आदेश देण्यात आले.
यानंतर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबतचा अहवाल पाठवला होता. रायते सध्या नंदुरबार तालुक्यात उमर्दे बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पदोन्नती मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.