म्हसावद l प्रतिनिधी
समस्त गुजर नाभिक समाज विभाग शहादा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संत सेना नाभिक समाज भूवन ,रामदेव बाबा नगर ,शहादा येथे आयोजित करण्यात आली होती त्यात सर्वानुमते नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली.
त्यात विखरन गट प्रदिप प्रकाश सोनवणे भटाणे, बामखेडा गट नरोत्तम मंगा सोनवणे बामखेडा, कहाटुळ गट राजेद्र रमन जाधव कहाटुळ, सारंगखेडागट संतोष लिमजी जाधव, कुर्हावद कवठळ, धुरखेडा गट पुरुष्षोतम कन्हैया शेल्टी,परीवर्धेगट किशोर लिमजी जाधव परीवर्धे, पाडळदा गट ईश्वर चिंधु जाधव पाडळदा,खेतियागट प्रा.गणेश परशराम कन्हैया म्हसावद, मोडगट काशिनाथ उखा जाधव बहुरुपा,तळोदागट भुषन राजाराम पवार तळोदा, कुकडेलगट अनिल रमन जांभळे,संतसेनाचौकगट दिलीप लक्ष्मन कन्हैया,
गांधीनगरगट संजय हिरालाल बोरदेकर,साईबाबानगरगट गिरधर नथ्थु सोनवणे, डोगरगांवरोड गट जगन पुंजरु राऊत अशा पंधरा सदस्याची एकमताने निवड करण्यात आली.त्यातुनच खालील पदाधिकारी निवडण्यात आले.
अध्यक्ष भुषन पवार, उपाध्यक्ष गिरधर सोनवणे, सचिव संजय बोरदेकर सहसचिव पुरुष्षोतम कन्हैया, कोषाध्यक्ष प्रदिप सोनवणे, प्रसिध्दीप्रमुख प्रा.गणेश कन्हैया वरील कार्यकारणीचा कालावधी तीन वर्षासाठी आहे. तसेत या निवडित समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी ,२१ कार्यकारनीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी,शिक्षण समीतीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी , गोकर्णमहादेव मंदिराचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, समाजातील सर्व जेष्ठ बांधव ,मित्र परीवार ,तरुण मंडळी विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते त्यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.