शहादा l प्रतिनिधी
येथील जायंटस हिरकणी सहेली तर्फे जागतिक आरोग्यदिना निमित्त “आपले आरोग्य आपल्या हाती” या विषयी जगदिश हाॅस्पीटलचे डाॅ. विवेक नगीन पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.
मधुमेह व जीवनशैली या विषयी अनमोल मार्गदर्शन केले.जायंटसचे स्पेशल कमिटी मेंबर रविंद्र जमादार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंटस फेडरेशन २ अ च्या ॲड. सौ. संगिता एच. पाटील ह्या होत्या. या प्रसंगी जायन्टसचे माजी फेड. अध्यक्ष माधव पाटील, जायंन्टस फेडरेशन संजय सोनार, फेडरेशन निमंत्रित सदस्य गणेश पाटील, माणक चौधरी,कैलास भावसार,जायंटस सहेली च्या अध्यक्षा अरुणाताई पाटील, जायन्टसचे माजी अध्यक्ष भुषण बाविस्कर, नरेंद्र पाटील, हिरकणी उपाध्यक्षा नलिनी सोनार, विजया मोरे, कोषाध्यक्षा प्रेरणा पाटील,संचालिका ज्योति परदेशी, वंदना चौधरी आदि उपस्थित होते.
आभार जायंटस हिरकणीच्या अध्यक्षा मनिषा हरी पाटील यांनी मानले.सुत्रसंचालन जायंटस गृपचे अध्यक्ष प्रा डाॅ एच एम पाटील यांनी केले.








