नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत अक्कलकुवा शहरात हायमस्ट लॅम्प बसविण्यात आले आहेत या हायमस्ट लॅम्पचे लोकार्पण विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, अक्कलकुवा च्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील इंदिरानगर तसेच केशवनगर येथे हाय मस्ट लॅम्पचे लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी अक्कलकोट ग्रामपंचायतीचे ,तुकाराम वळवी, सरपंच इम्रान मकरानी, माजी सरपंच अमरसिंह वळवी, बापु महिरे,काना नाईक, किरण चौधरी, संगीता पंजराळे, रावेंद्रसिंह चंदेल,गोलु चंदेल,लक्ष्मण साळवे, अमोलसिंह राणा, रोहीत सोनार, रोहित चौधरी,मोहसीन मकराणी,दीपक मराठे आदी उपस्थित होते.









