नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील बलवंत येथे चैत्र शुद्ध दशमी ३१ मार्च २३ ते सात मार्च २३ रोजी कथेची सांगता व भंडाराचे आयोजन ग्रामस्थतर्फे करण्यात आले आहे. ३१ मार्च २३ रोजी सकाळी श्रीरामाची संपूर्ण गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
ज्ञानेश्वरी सप्ताह ह भ प चतुर्भुज महाराज धरणगावकर यांचे यांच्या मार्गदर्शनाखाली तर राम कथा ह. भ. प. बन्सीलाल महाराज हनुमान टेकडी बलवंड यांच्या मार्गदर्शनाखाली ,विठ्ठलदास महाराज आरावेकर हे राम कथेचे निरूपण करणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा
पहाटे चार ते साडेचार प्रभात फेरी.सकाळी साडेचार ते सहा वाजे काकड आरती व भजन. ज्ञानेश्वरी पारायण सकाळी नऊ ते ११ व दुपारी तीन ते पाच. राम कथा रात्री आठ ते ११. सात एप्रिल रोजी ह भ प चतुर्भुज महाराज यांचे काल्याचे कीर्तन व ग्रामस्थ तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात झाकी दर्शन ह भ प मनोहर पाटील ,हार्मोनियम ह भ प राजे तुपे महाराज , तबलावादक म्हणून ह भ प केशव महाराज हे साथ देणार आहेत.
परिसरातील रजाळे शनिमांडळ, एईचाळे, सैताने तलवाडे, खर्दे खुर्द वैंदाणे खोकराळे, रनाळे, आसाने आदी गावातील भजनी मंडळी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ह भ प भजनी मंडळ बलवंत, समस्त ग्रामस्थ ,स्वाध्याय परिवार, शिवबा मित्र मंडळ, नवनिर्माण मित्र मंडळ ,महाराणा मित्र मंडळ, एकलव्य मित्र मंडळ बलवंड यांचे सहकार्य लाभणार आहे. श्रीराम कथा ज्ञानेश्वरी पारायण व महाप्रसादाचा लाभ घेण्याची ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.








