बोरद l प्रतिनिधी
बोरद येथील सेवानिवृत्त वन अधिकारी दिगंबर गणपत ढोडरे यांचा नातू व वासुदेव दिगंबर ढोडरे यांचा चिरंजीव प्रज्वल वासुदेव ढोडरे यांनी भारत सरकारच्या वतिने घेण्यात येणाऱ्या युनियन पब्लिक सर्व्हिस कॉर्पोरेशन च्या सेंट्रल आर्म पोलिस फोर्सची (UPSC) परीक्षा सन २०१९- २० मध्ये उत्तीर्ण झाल्याने त्याचा सेंट्रल रिसर्व पोलिस फोर्स सीआरपीएफ मध्ये निवड झाली आहे.त्याचे एका वर्षांसाठी प्रशिक्षण पूर्ण केले असून तो दिल्ली येथील गुरुग्राम येथे असलेल्या सीआरपीएफ अकॅडमीत होता.अतिशय कठीण असलेले प्रशिक्षण प्रज्वल ढोडरे यांनी अतिशय जिद्दीने व चिकाटीने पार पाडले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सीआरपीएफच्या ५३ व्या दिक्ष्यांत समारोहात प्रज्वल यांनी परेडचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला व केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याकडून त्याला सन्मानित करून पुरस्कार देण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल बोरद येथील ढोडरे परिवार व ग्रामपंचायत बोरद प्रशासनाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
बोरद येथील दिगंबर ढोडरे हे नागपूर जवळील रामटेक गावात नोकरीनिमित्त स्थायिक झाले होते. ते नागपूर येथे वन अधिकारी म्हणून कार्यरत होते ते आता तेथे स्थायिक झाले आहेत. त्यांचा नातू प्रज्वल ढोडरे यांनी नुकतीच यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली त्याचे नागपूर येथे प्रशासनामार्फत प्रशासकी पात्र देऊन सन्मान केला आहे त्याने बोरद येथील ढोढरे परिवाराचे नाव लवकिक केले व महाराष्ट्रातून बोरद गावाचे नाव उज्वल केल्याने बोरद गावाने व ग्रामपंचायत विभागाने तसेच ढोडरे परिवाराने त्याचे अभिनंदन केले व सर्व समाज बांधवांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.