नंदुरबार येथील बालवाडीत शिकणारी माहेरुन शाह या ४ वर्षांच्या चिमुकलीने आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत या महिन्यांमध्ये रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात. अशाच प्रकारे नंदुरबार येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष कालू पहेलवान शाह यांची बालवाडीत शिकणारी चार वर्षीय बालिका माहेरुन शाह या चिमुकलीनेही आपल्या जीवनातील पहिला रोजा ठेवला होता.
तसेच रोजा सोडताना अल्लाहकडे जगावर आलेले करोना संकटाचा समूळ नायनाट हो अशी चिमुकलीने दुवा केली. माहेरुन शाह या चिमुकलीने आपल्या जीवनातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.