म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे 30 मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव निमित्त म्हसावद,अनकवाडे गावात श्रीरामचंद्र प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.
पुर्ण गावात भगव्या रंगाच्या झालरी,झेंडे, प्रत्येकाच्या प्रांगणात रांगोळी काढण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात श्रीराभक्त,तरूण मंडळी सहभागी झाले होते.पुर्ण गावात ठिकठिकाणी आरती,पुजा करण्यात आली.चौकाचौकात महिलावर्गाने गरबा नृत्य केले. आठ दिवसापासून श्रीराम मंदीरात श्री. रामायण पाठ पारायण करण्यात आले.
मिरवणूकीत श्रीराम,लक्ष्मण,सीता,हनुमान यांच्या भुमिका मुलांनी साकारल्या.यावेळी श्रीराम मित्र मंडळ कोंडवाडा चौक,श्रीमंत श्री विठ्ठल रूखमाई मित्र मंडळ, श्री साई क्लब मित्र मंडळ,जय मल्हार मित्र मंडळ,तरूण मित्र मंडळ नवा प्लाॅट यांच्यातर्फे ऊसळ,मठ्ठा,पोहे ,सरबत,केळी,नाश्त्याची सोय करण्यात आली होती.श्रीराम नवमी समितीचे अध्यक्ष संजय तुकाराम पाटील,उपाध्यक्ष कैलास पाटील उपस्थित होते.
श्रीराम नवमी निमित्त गावात निघणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी किशोर बेदमुथा, संजय पाटील,चिंतामण लांडगे, अंबालाल लांडगे,महेंद्र पाटील,प्रसन्नकुमार बंब, रमाकांत पाटील,डॉ.रजनीकांत सूर्यवंशी,नंदलाल पाटील,ईश्वर पाटील,अनिल सूर्यवंशी,रोहित पाटील,पवन जगदाळे,विकास सोनार,जीवन शिंपी,कल्पेश पाटील, अशोक बागले,सतीलाल शेमळे,योगेश गोसावी,बलदेव राजपूत, चंद्रकांत मराठे,चेतन वडार,तरूण वर्ग, म्हसावद,अनकवाडे ग्रामस्थांनी सहभाग घेतला.रात्री मलोणी येथील भजन संध्या भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.








