Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अस्थीव्यंग शस्त्रक्रियेसाठी निधी उपलब्ध करुन देणार :पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
April 2, 2023
in राजकीय
0
अस्थीव्यंग शस्त्रक्रियेसाठी निधी उपलब्ध करुन देणार :पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार l प्रतिनिधी
 अस्थीव्यंग शस्त्रक्रियेसाठी आदिवासी विकास विभागामार्फत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
त्यांच्या हस्ते आज रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ, देवनार, ठाणे हिल्स, कॉव्हेटरी फोनिक्स आणि नंदनगरी, डॉ.हेडगेवार सेवा समिती,नंदुरबार व नंदुरबार जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, नंदुरबार यांच्यावतीने  जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयेाजित मोफत अस्थीव्यंग (दिव्यांग ) सुधारक शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ.शिवाजी सुक्रे, जिल्हा रुग्णालयाचे सर्जन डॉ.राजेश वसावे, सिनीयर ॲनेस्थेशियालॉजीस्ट, मुंबईचे डॉ.प्रमोद काळे, डॉ.मयुरेश वारके, डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्ण्दास पाटील, महाराष्ट्र राज्य औषध परिषद, मुंबईचे विनय श्रॉफ,  डॉ.हेडगेवार सेवा समितीचे सचिव, डॉ.नितीन पंचभाई, स्मित हॉस्पिटलचे संयोजक निलेश तवर, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा, जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएनशनचे सुनिल चौधरी, संतोष वसईकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावित म्हणाले की, आदिवासी बहुल जिल्ह्यातील अस्थीव्यंग (दिव्यांग) शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यासाठी  जो काही निधी लागेल ती आदिवासी विकास विभागामार्फत  उपलब्ध करण्यात येईल. प्रथम अशा प्रकारचे अस्थीव्यंग शिबीर पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात येईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर आदिवासी  बहुल जिल्ह्यात घेण्यात येईल.
स्वांतत्र्याच्या 75 वर्षानिमित्त  येत्या दोन वर्षांत राज्यातील गरीब लोकांना ज्यांच्याकडे घरे नाहीत अशा सर्वांना 100 टक्के घरकुल देणार असून दुर्गम भागातील बारमाही रस्ते तयार करण्यासाठी 4 हजार कोटीची तरतूद केली असून यावर्षी 2 हजार  कोटींची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या संस्थेमार्फत गोरगरीब, आदिवासी नागरिकांना शस्त्रक्रियेंसाठी जी मदत केली जाते त्यांचा आनंद खुप असतो. अशा गरीब लोकांना  केलेली मदत तो कधीही विसरत नाही असे त्यांनी सांगितले.कार्यकाचे सुत्रसंचलन उमेश शिंदे आभार रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल शर्मा यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी रोटरीचे मनोज गायकवाड सैय्यद शेख जितेंद्र सोनार जयेश महेश्वरी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे राम नवमी निमित्त निघाली भव्य शोभायात्रा

Next Post

नगाव येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

Next Post
नगाव येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

नगाव येथे शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add