तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण भागात विधी सेवा शिबिर अंतर्गत विविध कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक तालुका विधि सेवा समिती तळोद्याचे अध्यक्ष न्यायाधिश एस.डी.हरगुडे उपस्थित होते.
तळोदा तालुक्यातील काझीपुर ग्रामपंचायत कार्यालय, तलावडी येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचलित अनुदानित आश्रमशाळा, रोझवा व रोझवा पुनर्वसन येथील जिल्हा परिषद शाळा क्र.४, कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे विशेष विधी सेवा शिबिर अंतर्गत विविध कायदे विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा, पंचायत समिती तळोदा येथील सहाय्यक गटविकास अधिकारी आर.डी.सोनवणे तसेच तळोदा वकील संघाचे सचिव ॲड. सी.बी. आगळे उपस्थित होते.
पाचही कार्यक्रमात उपस्थितांना विविध दिवाणी व फौजदारी कायदे, शिक्षण हक्क कायदा, लैंगिक अत्याचार कायदा, घरगुती हिंसाचार, महिलांचे संरक्षण कायदा, ज्येष्ठ नागरिकांचे कायदे, विविध मोटार वाहन कायदे, रॅगिंग विषयी कायदे, भारतीय दंड विधान संहिते मधील विविध कलमाबाबत, अटकेतील आरोपीचे अधिकार, विधी सेवा समितीमार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांबाबत तसेच माध्यस्थता केंद्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना या संसर्गजन्य आजारापासून वाचण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत माहिती दिली व उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले.
यशस्वीतेसाठी ॲड. के.पी.बैसाणे, ॲड. एस.एन.पवार, ॲड. एस.पी.वसावे, ॲड. आर.आर.मगरे, ॲड. एम.बी.पवार, तसेच गावातील ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.