Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

३० वर्षांची परंपरा, १८५ कि.मी.चा प्रवास असलेल्या चौपाळे ते आशा दिंडीस प्रारंभ

team by team
March 28, 2023
in सामाजिक
0
३० वर्षांची परंपरा, १८५ कि.मी.चा प्रवास असलेल्या चौपाळे ते आशा दिंडीस प्रारंभ

नंदुरबार | प्रतिनिधी

संतश्री दगाजी महाराज यांचे जन्मस्थान चौपाळे ते जलसमाधी असेलेल्या आशा पदयात्रेस आज दि.२८ मार्चपासून प्रारंभ झाला असून ही दिंडी दि.४ एप्रिल रोजी आशा येथे पोहचणार आहे. आज सकाळी नंदुरबार शहरातील विविध चौकात दिंडीचे मोठया उत्साहाने स्वागत करण्यात आली असून या पदयात्रेस हजारो भाविक सहभागी झाले आहे. या दिंडीचे हे ३० वे वर्ष असुन १८५ कि.मी.चा दिंडीचा प्रवास आहे.

संतश्री दगाजी महाराज यांचे जन्मस्थान चौपाळे तर जलसमाधी घेतलेल्या आशा (गुजरात) पायी दिंडीला आजपासून ब्रम्हलीन रामचैतन्य बापू यांचे मानसपूत्र संतश्री संतोष चैतन्य महाराज यांच्या उपस्थितीत चौपाळे येथून प्रारंभ झाला. दरवर्षी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे संतश्री दगाजी महाराज यांचे जन्मस्थान ते जलसमाधी मॉ नर्मदा आशा येथे दिंडी यात्रा काढण्यात येते. आज मोठया संख्येत भाविक दिंडीत सहभागी झाले.

हरेराम जयघोषात ही दिंडी नंदुरबार शहरातील प्रमुख रस्त्यांवर मार्गस्थ झाली. या पदयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. आज दि.२८ मार्च रोजी चौपाळे येथून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. आज नंदुरबार तालुक्यातील वेळावद येथे मुक्काम केला. तेथून दि.२९ मार्च रोजी गुजरात राज्यातील कुकरमुंडा, दि.३० मार्च रोजी अक्कलकुवा येथे विश्राम तर कौली (खापर) येथे मुक्काम, दि.३१ मार्च रोजी धनसरा चौकडी (सागबारा) येथे विश्राम तर माच चौकडीचा अगोदर मुक्काम दि.१ एप्रिल रोजी डेडीयापाडा येथील पंडया आश्रम येथे विश्राम तर मोस्कुवा हनुमान मंदिर येथे मुक्काम, दि.२ एप्रिल रोजी दशामा मंदिर येथे विश्राम तर नेत्रंग येथे मुक्काम,

दि.३ एप्रिल रोजी घोलीफाटा (बल्लेश्‍वर) येथे विश्राम, तर राजपार्डी येथे मुक्काम ही पदयात्रा दि.४ एप्रिल रोजी उमल्ला येथे विश्राम तर रात्री निर्लोभी आश्रम आशा येथे पोहचणार आहे. या पदयात्रेचे ३० वे वर्ष असून १८५ कि.मी.चा दिंडीचा प्रवास आहे. या दरम्यान भाविकांच्या भोजन व व्यवस्थेसाठी शेकडो दाते दान करीत असतात. दि.५ एप्रिल रोजी सकाळी नर्मदा मातेचे जलभिषेक व संतश्री दगाजी महाराजांची आत्मज्योत विसर्जन करण्यात येते. यानंतर पादुकापूजन करून निर्लोभी आश्रम आशातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दिंडीची सांगता होत असते. दरम्यान आज नंदुरबार शहरात सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास दिंडीचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी दिंडीचे पुजन करून प्रसाद वाटप करण्यात आला.

दिंडीत संतश्री दगाजी महाराजांचे मानसपूत्र संतश्री संतोष चैतन्य महाराज अध्यक्ष महादेव बालब्रम्हचारी आदी सहभागी झाले होते. सदर दिंडीचे आयोजन संतश्री दगाजी महाराज भक्त परिवारातर्फे करण्यात आले. यावेळी चौकचौकात दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिस्तीत पदयात्रा पहायला मिळाली. पदयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

निर्णय वेगवान घेवून कांदा उत्पादकांना गतिमान शासनाचा दिलासा

Next Post

हवामान बदलामुळे जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता : हवामान तज्ञ सचिन फड

Next Post
हवामान बदलामुळे जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता :  हवामान तज्ञ सचिन फड

हवामान बदलामुळे जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता : हवामान तज्ञ सचिन फड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add