Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हवामान बदलामुळे जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता : हवामान तज्ञ सचिन फड

team by team
March 29, 2023
in राज्य
0
हवामान बदलामुळे जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता :  हवामान तज्ञ सचिन फड

नंदूरबार l प्रतिनिधी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( NDMA), नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), मंत्रालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), नंदुरबार यांच्या समन्वयातुन जिल्ह्यात आपत्ती पूर्व तयारी, क्षमतावर्धन व प्रशिक्षण, DRR अंतर्गत जिल्ह्यामध्ये आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून सदर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ३०० आपदा मित्र स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तिसऱ्या बॅचच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये २३ मार्च जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे विषय विशेषज्ञ कृषि हवामान सचिन फड यांनी आपदा मित्र स्वयंसेवकांना जिल्ह्यातील हवामानाचा आढावा, हवामान बदल, हवामान बदलामुळे येणाऱ्या आपत्ती, त्याचे परीणाम व आपत्तींचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

बोलताना ते म्हणाले की, मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील सरासरी हवामानात बदल होत असून त्याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट, थंडीची लाट, गारपीट तसेच अवेळी पाऊस, कमी दिवसात जास्त पाऊस, चक्रीवादळ, विज पडण्याच्या घटना अनुभवयास येत आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान, जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. लोकांनी तसेच आपदा मित्रांनी हवामानाचा अंदाज घेऊन तसेच विज पडण्याची पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी दामिनी आणि हवामान अंदाज व कृषि सल्ला मिळवण्यासाठी मेघदूत ॲप वापरावे ज्यामुळे आपण वेळीच सावध होऊन येणाऱ्या आपत्तीस सामोरे जाण्यास तयार राहू आणि होणारी हानी कमी करता येईल असे सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस निरीक्षक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) धुळे, शमोहन परीहार, पोलीस उपनिरीक्षक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) धुळे, श्री विजय गावंडे, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, NDMA प्रकल्प, सुनिल गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हा नंदुरबार वसंत बोरसे व SDRF धुळे यांचे जवान, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नंदुरबार चे प्राध्यापक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

३० वर्षांची परंपरा, १८५ कि.मी.चा प्रवास असलेल्या चौपाळे ते आशा दिंडीस प्रारंभ

Next Post

धडाकेबाज कारवाई: नवापूर पोलीसांच्या छाप्यात 40 गॅस सिलिंडर जप्त

Next Post
धडाकेबाज कारवाई: नवापूर पोलीसांच्या छाप्यात 40 गॅस सिलिंडर जप्त

धडाकेबाज कारवाई: नवापूर पोलीसांच्या छाप्यात 40 गॅस सिलिंडर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add