शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि. २३ ते २५ मार्च २०२३ दरम्यान महाविद्यालयातील पर्यावरण अभ्यास विभागांतर्गत प्रथम वर्ष कला, विज्ञान व वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांकडून सीडबाॅल उपक्रम राबविण्यात आला.
क.ब.चौ.उ.म.वि. जळगावच्या परिपत्रकानुसार ४० गुण हे फिल्डवर्क अहवालसाठी ठेवण्यात आलेले आहेत. फिल्डवर्कसाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक क्षेत्र अहवाल करावयाचा असतो. तसेच सोबतच यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण संवर्धन करण्याच्या हेतूने आपला खारीचा वाटा म्हणून कमीतकमी 10 बियाण्यांचे गोळे (Seed Balls) तयार करून जमा करावे. आपल्या परिसरात असणाऱ्या निंब, चिंच, वड, पिंपळ, उंबर, सिताफळ, रामफळ, बोर, आवळा इ. वृक्षाच्या बियागोळा करून ते मातीचे गोळे बनवायचे आवाहन पर्यावरण अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.प्रशांत आर. तोरवणे यांनी केले होते.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सोबतच काही विद्यार्थ्यांनी विविध वृक्षाच्या बियाही गोळा करून आणल्यात. जमा केलेल्या बिया व गोळे पावसाळ्यात योग्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मदतीने टाकण्यात येतील. यावेळी भूगोल विभाग प्रमुख डॉ.यु.व्ही.निळे, प्रा.राहुल व्ही. पाटील, प्रा.मीना एन.पटेल, प्रा.विकेश पावरा, प्रा.भूषण पाटील सुरेंद्र वळवी व संजय विसावे हे उपस्थित होते. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा..मकरंद पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील इत्यादीनी कौतुक केले.








